Viral News : घोर कलीयुग..! करोडपती असूनही रहावं लागतंय गरीबीत, Social Media Post व्हायरल

एका व्यक्तीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीलंय, मल्टी मिलेनीयर असूनही कुटुंब आलं की, लहानशा फ्लॅटमध्ये राहतो.
Viral News
Viral Newsesakal
Updated on

Social Media Post Viral News : बरेच लोक आपल्या नातेवाइकांपासून आपली श्रीमंती, पैसा लपवतात. कारण त्यांना वाटतं की, त्यांच्या श्रीमंतीला कोणाची नजर लागेल किंवा लोक त्यांच्यावर जळतील. तर काही लोक असतात ते आपल्याकडे काही नसले तर उगाच पैशांचा बडेजाव करतात.

पण आज अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत जो आपल्या आई-वडिलांसमोरच गरीब असण्याचं नाटक करतो. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, तो श्रीमंत आहे पण त्याला कुटुंबासमोर गरीब असण्याचं नाटक करावं लागतं.

त्याने रेडिट वर  ट्रू ऑफ माई चेस्ट थ्रेड इथे पोस्ट करत सांगितलं की, तो आपल्या घरच्यांना कधीच आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी खरं सांगणार नाही. त्यांनी फक्त त्याचा फायदा उचलला आहे. ते कायम त्याला पैसे मागायचे, त्याच्या घराला फ्री व्हेकेशन समजून कधीही येत असे.

नोकरी मिळताच आईने पहिले पगार विचारला

पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, मी एक मल्टी मिलीनियर आहे. पण जेव्हा माझ्या घरचे मला भेटायला येतात तेव्हा एक स्वस्तातला फ्लॅट मी भाड्याने घेतो आणि तिथेच राहतो. तो लिहितो की, हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा मी परदेशात पदवी घेतल्यानंतर नोकरीला लागलो, तेव्हा आईने पहिलाच प्रश्न विचारला की, किती कमवतोस? त्याने खरं सांगितलं तेव्हा आई-वडिलांना वाटलं मुलगा श्रीमंत आहे. आणि त्यांची वागणूक पूर्णच बदलली. वास्तविक पाहता ज्या देशात तो नोकरी करत होता तिथल्या दृष्टीने पगार अगदी थोडाच होता.

Viral News
Viral News : आई गं..! नवजात बालकाला कुत्र्याने तोंडात धरलं, अन्...

फ्री व्हेकेशन समजून येऊन बसत

त्याने लिहिलं की, जेव्हा पहिला पगार झाला तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याला फोर्स केला की, त्यांच्या येण्या-जाण्यापासून ते सर्व खर्च त्यानेच करायचा. त्यांना फक्त एक फ्री व्हेकेशन हवा होता आणि मला आपला टूर गाइड व एटीएम बनवलं होतं. माझा विचारच नव्हता. यावर अजून इतर घरच्यांनाही माझ्याकडून एंजॉय करवून घ्यायला सांगत होते.

आता मी समजलो होतो, घरच्यांशी अंतर वाढवलं...

जेव्हा मी घरी जायचो तेव्हा त्यांची अपेक्षा असायची की, मी खूप गिफ्ट आणावे. जेव्हा आम्ही बाहेर जात तेव्हा बिल मीच द्यावं अशी त्यांची अपेक्षा असे. मी माझ्या भावा, बहिणीच्या ट्यूशन क्लासची फीज द्यावी असं ते सांगायचे. माझ्या घरचे लोक किती स्वार्थी आहेत हे मी ओळखलं होतं. आता त्यांच्याशी मी अंतर ठेवून वागू लागलो. मग त्यांना फोन आणि मेसेज बंद केले. माझ्या आयुष्याविषयी कमीत कमी सांगू लागलो. मी ओळखलं होतं की, हे लोक माझ्यासाठी नाहीत.

Viral News
Viral News : अबब! एका व्यक्तीने वर्षभरात चक्क सहा लाखांची इडली खाल्ली

पेंट हाऊस असूनही स्वस्त फ्लॅटमध्ये रहायला जातो

जेव्हा कोरोना आला तेव्हा मी एक बिझनेस सुरू केला. जो चांगला चालला. मग मी नोकरीपण सोडून टाकली. घरी खोटंच सांगितलं की, माझी नोकरी गेली. आता आर्थिक चणचण आहे. यानंतर कुटुंबाने माझ्याशी बोलणं कमी केलं. मग काही दिवसांनी खोटंच सांगितलं की, नोकरी मिळाली पण पगार खूप कमी आहे. त्यामुळे आता ते जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा स्वतःचा सगळा खर्च ते स्वतः करतात. आज माझ्याकडे पेंट हाऊस असलं तरी ते लोक येतात तेव्हा मी एका साध्या स्वस्त फ्लॅटमध्ये रहायला जातो. स्वतःला गरीब दाखवण्यासाठी.

साध्या कपड्यांच्या दोन सुटकेस भरून ठेवल्या आहेत. ते आल्यावर स्वस्तातला फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे जातो. आता मी फ्लॅटच्या फरशीवर झोपून हे लिहित आहे. कारण माझ्या घरचे पलंगावर आणि सोफ्यावर झोपले आहेत.

या पोस्टवर मोठ्याप्रमाणात लोकांचे कमेंट येत आहेत. काही टॉक्सिक कुटुंब म्हणतात. तर कोणी म्हटलं आहे की अशी वागणून बऱ्याच घरांमध्ये सामान्य झाली आहे. हे बदलायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()