Viral : ऑनलाईन गेमचा नाद वाईटच! पोलिस कॉन्स्टेबलने घालवले १५ लाख,व्हिडिओ शेअर करून...

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलने एका ऑनलाईन गेमच्या नादाला लागून लाखोंचे कर्ज करून घेतेल आहे
Viral :
Viral : esakal
Updated on

Viral :

ऑनलाइन गेमच्या नादात अनेकांनी आपला घर संसार बुडवला आहे. अनेक लोकांचे बँक अकाउंट रिकामी झाले आहेत. ऑनलाइन गेमिंग खेळू नका असे सांगणारे पोलीसही या गेमच्या चक्कर मध्ये अडकले आहेत. नुकतेच एका पोलिसाने ९६ लाख रुपये बुडवले होते. आता पुन्हा अशीच घटना समोर आली आहे.  

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलने एका ऑनलाईन गेमच्या नादाला लागून लाखोंचे कर्ज करून घेतेल आहे. हा कॉन्स्टेबल कर्जबाजारी झाला असून. त्याने एका व्हिडिओतून आपल्या वरिष्ठांकडे प्रत्येकी 500 रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया. (Viral)

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये सूर्य प्रकाश नावाचे कॉन्स्टेबल आहे. त्यांनी 24 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ बनवलाय आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट केला. या व्हिडिओत त्यांनी ‘मी कॉन्स्टेबल सूर्यप्रकाश, मी 112 मध्ये कार्यरत आहे. मी काही दिवसांपासून नैराश्य ग्रस्त आहे. मी बँकेतून कर्ज काढून आणि इतर लोकांकडून उधार पैसे घेऊन ऑनलाईन गेम मध्ये घालवले आहेत.

ऑनलाईन गेममध्ये मला फायदा झाला नाही तर नुकसानच झाले. ही रक्कम दहा ते पंधरा लाख रुपये आहे. त्यामुळे माझी मानसिक स्थिती बिघडलेली आहे. काय करावे हे मला समजत नाहीये. मी आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही प्रत्येक  पोलिस कर्मचाऱ्याकडून  500 रुपये घेऊन मला दिले तर माझ्या डोक्यावरील कर्ज थोडे कमी होईल.

Viral :
Viral Video: फेमस होण्यासाठी इंदौरच्या चौपाटीवर अर्धनग्न अवस्थेत फिरू लागली तरुणी; भाजप नेत्याने फटकारताच पोस्ट केला आणखी एक व्हिडिओ

जर तुम्ही मला मदत केली तर मी काही चुकीचं पाऊल उचलण्यापासून स्वतःला थांबवू शकेन. त्यामुळे मी स्वतःचं कर्ज फेळू शकेन आणि पुन्हा सामान्य जीवन जगू शकेल. असं झाले नाही तर मी आत्महत्या करेन.

या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस प्रशासनाने धाडसाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आता कॉन्स्टेबल सूर्यप्रकाश याचे कौन्सलिंग सुरू असून सर्व काही ठीक होईल असा विश्वास त्याला पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. तो दोन दिवसाची सुट्टी घेऊन गेला होता आणि चार-पाच दिवसांपर्यंत ड्युटीवर आलाच नाही त्यामुळे आता त्याचा तपासही केला जात आहे.

Viral :
Viral video: आता 'थाला फॉर रिजन' नाही तर 'अण्णा फॉर रिजन'; अश्विनची सहकाऱ्यांकडून मस्करी

सोशल मीडियावर चर्चेत आहे हिमांशू मिश्रा

सूर्यप्रकाशच्या आधी हिमांशू मिश्रा नावाचा एक कॉन्स्टेबल सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्याचं कारण हेच होतं की, तो ऑनलाइन गेमिंगच्या नादाला लागून त्याने 96 लाख रुपये घालवले होते. या नुकसानानंतर त्याच्या आई-वडिलांनी मुलासोबत ते सगळे संबंध तोडले होते. आणि आता ऑनलाईन गेमिंगच्या नादात सुर्य प्रकाश अडकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.