Viral Video: उन्हाने ओल्यांडल्या मर्यादा, तापत्या वाळूवर बीएसएफ जवानाने भाजले पापड; पाहा व्हायरल होणार व्हिडिओ

BSF Jawan Bikaner: या व्हिडिओमधील ठिकाण पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बिकानेरच्या खाजुवालाचा असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानमधील सर्वात उष्ण शहर म्हणून बिकानेरला ओळखले जाते.
BSF Jawan Papad Bikaner
BSF Jawan Papad BikanerEsakal
Updated on

यंदाचा उन्हाळा देशभरात सर्वत्र आव्हानात्मक ठरत आहे. अनेक राज्यांध्ये तापमानाने 44 डिग्री पार केले आहे. या उन आणि उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. अशात राजस्थानमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहणू तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण सध्या तेथे ड्युटीवर असलेल्या बीएसएफ जवानाने चक्क वाळूवर पापड भाजले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बिकानेरमध्ये ड्युटीवर असलेला एक बीएसएफ जवान तापत्या वाळूवर पापड भाजत आहे.

यावरून लक्षात येते की, देशाचे रक्षण करताना आपले जवान उन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडतात.

एकीकडे उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी लोक एसी आणि कुलरचा सहारा घेत आहेत, तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले जवान या कडाक्याच्या उन्हात रात्रंदिवस सतर्क आहेत, जेणेकरून नागरिक सुरक्षित राहू शकतील.

BSF Jawan Papad Bikaner
Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

एका एक्सवरील युजरने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. याबरोबर युजरने लिहिले की, बिकानेरमधील तापमान 47 डिग्रीच्या पुढे गेले आहे. आणि बीएसएफ जवानाने गरम वाळूत पापड भाजले. इतक्या उष्णतेतही जवान समीमेवर आपली सेवा बजावत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील ठिकाण पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बिकानेरच्या खाजुवालाचा असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानमधील सर्वात उष्ण शहर म्हणून बिकानेरला ओळखले जाते. अशा कडाक्याच्या उन्हातही सैनिक देशाच्या रक्षणासाठी वाळवंटात उभे आहेत.

BSF Jawan Papad Bikaner
Viral Video: बैलाला गोंजारणे आले अंगलट; महिलेच्या फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.