Viral Video : अय्यो, पाप! चिखलात अडकली सुसाट धावणारी गाडी, प्रियकराला सोडून प्रेयसीने घेतली ट्रकवर उडी

Viral Video वर पडला कमेंट्सचा पाऊस, 'प्रेमात सर्व दु:ख पुरूषांच्याच वाट्याला का येतात'
Viral Video
Viral Video esakal
Updated on

Viral Video :

आजकाल तरूण-तरूण प्रेमात आंधळे होत बाईक पळवत असतात. बाईकचं हे वेड प्रेमी युगुलांना कधी पोलिस स्टेशनात नेतं, तर कधी ते खड्डयातही रूतून बसतात. असेच प्रेमात अडकलेले जोडपं जेव्हा चिखलात अडकतं तेव्हा काय परिस्थिती उद्भवते याचा नमुनाच आज पहायला मिळाला आहे.

‘मरते दम तक साथ रहेंगे’ असे म्हणत प्रेमाच्या आणाभाका घेतलेली जोडपी प्रसंगावधान राखून वागतात. तर काही मोजकेच असतात जे शेवटपर्यंत साथ देतात. घरच्यांसमोर अफेअर उघडकीस आलं की काहींचे सूर बदलतात. सोशल मिडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून असंच म्हणावं लागेल.

Viral Video
Nashik Flood: पुराच्या पाण्यातून रस्ता क्रॉस करताना कार अडकली! थरारक Video Viral

एक तरूण बाईक सुस्साट पळवत आणतो अन् रस्त्यावरील भल्यामोठ्या खड्ड्यात चिखलात रूतून बसतो. लाखो प्रयत्न करूनही बाईक चिखलातून बाहेर पडू शकलेली नाही. दोघेही मदतीच्या आशेने दुचाकीवरच बसलेले असतात.

पुढच्याच क्षणी दोघांच्या जवळून एक ट्रक गेला. प्रेयसीने संधी पाहून लगेचच ट्रकवर उडी मारली आणि चिखलातून सहज बाहेर आली. ट्रकमधील व्यक्तीनेही तिला आधार देत चिखलातून बाहेर काढलं. मात्र, बिचारा तर बिचारा प्रियकर दुचाकीसह चिखलातच राहिला.

Viral Video
Manoj Jarange: सोलापुरात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत; Video Viral

हा व्हिडिओ giedde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'कदाचित त्या मुलानेच मुलीला तिथून जायला सांगितले असेल. ' दुसऱ्या यूजरने लिहिले की, प्रेमात सर्व दु:ख पुरूषांच्याच वाट्याला का येतात, असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()