Viral Video: सहकाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवत होता अन् स्वत:च वाघाच्या पिंजऱ्यात अडकला वनअधिकारी, उपस्थित सगळ्यांना फुटला घाम

Forest Official Trapped for an Hour During Demonstration in Tiger Cage: अधिकारी मदतीसाठी ओरडत होते आणि पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पिंजऱ्याचे दार अडकले होते आणि तासभर प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता आले नाही. अखेर, वन कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक प्रयत्न करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
Forest official trapped in a tiger cage during a demonstration in Lakhimpur Kheri, struggling to get out.
Forest official trapped in a tiger cage during a demonstration in Lakhimpur Kheri, struggling to get out.esakal
Updated on

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील महेशपूर जंगल क्षेत्रातील एक विचित्र आणि धोकादायक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. वन विभागाचे एक अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना वाघाला कसे पकडायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत असताना स्वतःच वाघाच्या पिंजऱ्यात अडकले. तब्बल तासभर अडकलेल्या या अधिकाऱ्याला बाहेर काढण्यात वन कर्मचाऱ्यांना मोठ्या कसरती कराव्या लागल्या.

महेशपूर जंगल क्षेत्रात वाघाला पकडण्याची प्रक्रिया कशी करायची हे दाखवताना हा अधिकारी चुकून पिंजऱ्यात अडकला. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, अधिकारी मदतीसाठी ओरडत होते आणि पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पिंजऱ्याचे दार अडकले होते आणि तासभर प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता आले नाही. अखेर, वन कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक प्रयत्न करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही जणांनी याला "यशस्वी प्रात्यक्षिक" असे म्हटले आहे, कारण पिंजऱ्यातून वाघ किंवा कोणत्याही प्राण्याच्या पळून जाण्याची शक्यता शून्य होती. तसेच, पिंजऱ्याचे बांधकाम उत्तम असल्याचेही लोकांनी नमूद केले आहे.

Forest official trapped in a tiger cage during a demonstration in Lakhimpur Kheri, struggling to get out.
Video Viral: आधी I love you बोल, मगच...; शाळकरी मुलींचा ठरकी दुकानदारला चोप, सर्वत्र होतंय कौतुक

वाघ आणि इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांची वाढती भीती

लखीमपूर खीरी भागात वाघ आणि इतर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आधीच भीतीचे वातावरण पसरले आहे. अलीकडेच, एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर वाघाला पकडण्याच्या उद्देशाने या प्रात्यक्षिकाची आखणी करण्यात आली होती. याशिवाय, बहरेच जवळच्या लखीमपूर जिल्ह्यात लांडग्यांच्या हल्ल्यांची मालिका घडल्याचीही नोंद आहे, ज्यात शेतकरी, गाय आणि कुत्र्यांवर हल्ले झाले.

महेशपूर जंगलातील या घटनेने वाघांच्या उपस्थितीमुळे परिसरात अधिकच भीती पसरली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर स्थानिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच, परिसरातील जंगली प्राण्यांची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाने आणखी कडक उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

Forest official trapped in a tiger cage during a demonstration in Lakhimpur Kheri, struggling to get out.
Vanraj Andekar Case: "पोटावर पाय देतोस, तुला आज पोरं बोलावून ठोकतेच..."; लाडक्या बहिणीनं काय दिली होती वनराज आंदेकरला धमकी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.