Viral Video : इतनी खुशी! नवरदेवाने घेतली रस्त्यावर लोळण, हा डान्स पाहून नवरी पळून जाऊ नये म्हणजे मिळवलं!

उत्साही नवरदेवही स्वत:ला रोखू शकला नाही
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video :

सध्याच्या पोरांची लग्न ठरेना झाली आहेत. लग्न होत नसलेल्या मुलाला अनेक मुलीनंतर एखादी मुलगी पसंत करते. तेव्हा त्याचा आनंद गगनाच्याही वर जातो असंच म्हणावं लागतं. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा नवरदेवाचा आनंदी अवतार दाखवणार आहोत. जो, पाहून तुम्हीही हसून-हसून घरात लोळण घ्याल.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नवरदेवासमोर लोक हलगीच्या तालावर नाचत आहेत. त्यामुळे उत्साही नवरदेवही स्वत:ला रोखू शकला नाही. त्यानेही रस्त्यात नाचायला सुरूवात केली. रस्त्याच उभे राहून नाचत होता, तोवर ठिक होतं पण नंतर तो रस्त्यावर बसून आणि लोळण घेऊन नाचू लागला.

Viral Video
Bus Conductor Viral Video: फुल ऑन ॲक्शन! कंडक्टर ठरला देवदूत, नेटकरी करतायेत कौतूक, पोलिसांनी केला सत्कार

विशेष म्हणजे नवरदेवाच्या मागे छत्री घेऊन उभारलेला व्यक्तीही नाचत होता. आणि नवरदेवाच्या डोक्यावर छत्री हटू नये यासाठी धडपडत होता. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर sambalpuriya_ame_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

या नवरदेवाला त्याचे लग्न ठरल्याचा इतका आनद झाला आहे की, त्याने रस्त्यात पावसाने झालेल्या चिखलात झोपून डान्स केला आहे. ज्यामुळे त्याची लग्नाची शेरवानीही खराब झाली आहे. तरीही नवरदेवाचा उत्साह काही कमी झाला नाहीय.   

Viral Video
Baramati Lok Sabha Result: अमेरिकेतही पवारांची चर्चा! ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकले शरद पवार-सुप्रिया सुळेचे फोटो; Video Viral

हा मजेदार व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे 5 लाख लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, मी कदाचित माझ्या स्वतःच्या लग्नात तितका आनंदी नसेन जितका मला त्यांचे लग्न पाहून वाटत आहे. आणखी एका युजरने लिहिले, भाऊ शेरवानी गेली, आता नवरीही पळून जावू नये म्हणजे मिळवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.