Mental Health: ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? वाचा काय आहे व्हायरल सत्य

Mental Health: ब्लड टेस्टने अनेक आजारांचे निदान करणे सोपे होते. पण आता ब्लड टेस्टने मानसिक आजाराचे निदान केले जाणार आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल.
Mental Health:
Mental Health:Sakal
Updated on

Mental Health: ब्लड टेस्टने अनेक आजारांचे निदान करणे सोपे होते. पण आता ब्लड टेस्टने मानसिक आजाराचे निदान केले जाणार आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. बायो-मार्कर्सच्या वापराने रोगाची पुष्टी होणार आहे. या तंत्रज्ञानाने झटपट आजाराचं निदान होणार असा दावा करण्यात आला आहे. पण हा दावा खरा आहे खोटा याची तपासणी साम वृत्तवाहिनीने केली आहे.

काय आहे दावा

अनेक लोक मानसिक आजारांना सामोरे जात असतात. पण हा आजार गंभीर झाल्यास व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. ब्लड टेस्ट करून मानसिक आजाराचे निदान करता येणार असा दावा करण्यात आला आहे. बायो-मार्कर्स हे तंत्रज्ञान अवगत झाल्यावर या आजारावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. बापोलर डिसऑर्डर साध्या रक्त चाचणीने शोधता येतो. केंब्रिज विद्यापिठातील संशोधकांनी वैद्यकीय चाचणी शोधून काढली आहे. पण हे तंत्रज्ञान येण्यास थोडा वेळ लागू शकतो.

Mental Health:
Fake Butter: लहान मुलांना ब्रेड-बटर खायला देताय? तर थांबा, व्हायरल व्हिडिओचं सत्य पाहा

एमआरआयवर मेंदुचे जे विभाग आहेत ते अॅबनॉरमल दिसतात हे समजले तर आपण हे प्रुव्ह करू शकतो की ही व्यक्ती बापोलर डिसऑर्डर,डिमेंशिया यासारख्या आजाराने ग्रासलेली आहे. तसेच त्यांच्यावर लवकर उपचार सुरू करावे.

डॉ. रश्मीन अचलिया, न्युरोसायट्रिस्ट

मानसिक आजाराचे रूग्ण किती आहेत?

जगभरात मानसिक आजारने 8 कोटींहून अधिक लोक त्रस्त आहेत. त्यापैकी सुमारे 40 टक्के रूग्णांना हा आजार नैराश्यात नेतो. दोन्हींची लक्षणे जवळपास सारखीच दिसतात. यामुळे हे तत्रज्ञान लवकरच उपलब्ध झाल्यास त्रस्त लोकांना ब्लड टेस्टवरून निदान करता येईल. तसेच लाखो लोकांचे जीव वाचतील. यामुळे हा दावा खरा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.