Viral Video: भाजप आमदाराला वकिलांनी चोपलं, दुसऱ्यानं गचांडी पकडली.. पोलिसांसमोर झाला जोरदार राडा!

BJP MLA Slapped by Advocate, Tension Escalates Ahead of Local Elections : वकिलाची ओळख बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंग म्हणून झाली आहे. या घटनेने लखीमपूर खेरीतील नगर सहकारी बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीपूर्वी तणावाची परिस्थिती निर्माण केली आहे.
BJP MLA Yogesh Verma being slapped by Advocate Awadhesh Singh in Lakhimpur Kheri, caught on camera, went viral.
BJP MLA Yogesh Verma being slapped by Advocate Awadhesh Singh in Lakhimpur Kheri, caught on camera, went viral. esakal
Updated on

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये बुधवारी भाजप आमदार योगेश वर्मा यांच्यावर एका वकिलाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. घटनेनंतर योगेश वर्मा यांच्या समर्थकांनी वकिलावर प्रतिहल्ला केला, ज्यामुळे तिथे जोरदार गोंधळ झाला. पोलिसांनी या गोंधळात हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

नेमके काय घडले?

वकिलाची ओळख बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंग म्हणून झाली आहे. या घटनेने लखीमपूर खेरीतील नगर सहकारी बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीपूर्वी तणावाची परिस्थिती निर्माण केली आहे. निवडणुका जसजशा जवळ आल्या, तसतसा तणाव वाढत चालला आहे.

वादाचे मूळ कारण काय?

या हल्ल्याच्या घटनेच्या पाठीमागे नगर सहकारी बँकेच्या निवडणुकीचा वाद आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुनील सिंग आणि आमदार योगेश वर्मा यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय सिंग यांनी निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादीत छेडछाड झाल्याच्या आरोपांचादेखील समावेश झाला आहे. काही सदस्यांनी मतदार यादी फाडल्याचा दावा केला आहे.

BJP MLA Yogesh Verma being slapped by Advocate Awadhesh Singh in Lakhimpur Kheri, caught on camera, went viral.
Laddu Mutya Baba: फिरता पंखा हातानं थांबवला अन् लड्डू मुत्त्या बाबाचं भांडं फुटलं; विज्ञानामुळं उलगडलं सत्य,व्हिडिओ पाहा

या निवडणुका १४ ऑक्टोबर रोजी होणार आहेत, जिथे मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी पार पडणार आहे. सुमारे १२,००० भागधारक या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. नामांकन प्रक्रिया बुधवारी सुरू होणार होती, तर १० ऑक्टोबर रोजी नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख होती. ११ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.

या सर्व तणावपूर्ण घटनेत आमदार योगेश वर्मा यांनी निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केला. ज्यामुळे या निवडणुकीभोवती आणखी वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक नाही असे वर्मा यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, जिल्हाधिकारी संजय सिंग यांनी निवडणुका निष्पक्ष आणि वेळेवर होतील, असा पुनरुच्चार केला आहे.

BJP MLA Yogesh Verma being slapped by Advocate Awadhesh Singh in Lakhimpur Kheri, caught on camera, went viral.
Video Viral: हृदयद्रावक प्रसंग! पुण्यात गरबा खेळता-खेळता जमिनीवर कोसळले अन् मृत्यूनं गाठलं, नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.