Viral Video : गुजरातमध्ये किर्तन गाणाऱ्यांवर पैशांचा पाऊस, आता इंदूरीकर महाराज काय म्हणतील ?

एका धार्मिक कार्यक्रमात लोकगायक 'कीर्तिदान गढ़वी' यांच्यावर सोने चांदी आणि पैशाचा पाऊस होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Viral Video
Viral Videosakal
Updated on

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. काही व्हिडीओ तर अगदी थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

एका धार्मिक कार्यक्रमात लोकगायक 'कीर्तिदान गढ़वी' यांच्यावर सोने चांदी आणि पैशाचा पाऊस होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Viral Video of money falling on Kirtankar in Gujarat what will indurikar maharaj say on it )

हा व्हिडीओ गुजरातच्या बनासकांठा येथील पालनपुरचा आहे. येथे एका धार्मिक महोत्सवात तेथील फेमस लोकगायक 'कीर्तिदान गढ़वी' यांच्यावर नागरीकांनी चक्क सोने-चांदीच्या नाण्यांचा आणि लाखो रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडलाय. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे. पण हे खरंय.

व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. इतिहास पहिल्यांदाच एका लोकगायकासोबत असं होतंय. त्यामुळे हा व्हायरल व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

महाराष्ट्रात सध्या प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील फेमस डान्सर गौतमी पाटीलच्या इनकमविषयी बोलताना त्यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.

इंदूरीकर महाराज म्हणाले होते, "तिने ३ गाणी वाजवली आणि ३ लाख रुपये घेतले पण आम्ही जर आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली से म्हणतात.' त्यांचे हे विधान बरेच गाजले होते. आता या गुजरातच्या किर्तन गाणाऱ्यांवर पैशांचा पाऊस पडतोय यावर आता इंदूरीकर महाराज काय म्हणतील?...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()