Viral Video: या महिलांच्या टाईम मॅनेजमेंटला सलाम! सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय हा व्हिडीओ

मुंबईतील महिलांच्या स्पिरिटचं उत्तम उदाहरण देणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघायला हवा
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभऱ्यात काय चाललंय ते आपल्याला मिनिटांत कळण्यास मदत होते. मुंबईच्या लोकलमधले बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही बघितले असतील. असाच एक व्हिडीओ काही तासांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबईतील महिलांच्या स्पिरिटचं उत्तम उदाहरण देणारा हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघायला हवा.

मुंबईच्या धावपळीच्या लोकल प्रवासात आणि काही मिनीटांच्या थांबलेल्या लोकलमध्ये वेळेत मोठी मोठी ओझी चढवत रोज बाजारपेठेत विकायला जाणाऱ्या मुंबईच्या सर्वसामान्य महिलांचा हा व्हिडीओ आहे. त्याच्या नियोजनाची आणि स्पिरिटची नेटकरीही दाद देताय. मुंबईतील महिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला प्लॅटफॉर्मवर लोकल थांबण्याच्या वेळेआधीच बाजारपेठेत विकायला नेत असलेल्या फूलांच्या भल्या मोठ्या हाऱ्यांसह तयार असल्याच्या दिसताय. लोकल थांबत नाही तोवर फूल जोशात या महिला भरभक्कम फूलांचे हारे डोक्यावर घेत लोकलमध्ये वेगाने टाकताना दिसताय. त्यांच्या नियोजनाची ही ट्रीक बघता अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय.

Viral Video
Viral Tweet: मी, यूपीएससी अन् माझं कुटुंब! IAS अधिकाऱ्याचे हृदयस्पर्शी प्रवास सांगणारे ट्विट

कमी वेळेत आणि वेगाने काम करत दररोज लोकलचा संघर्षमय प्रवास कसा असतो हे या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. त्यांची मॅनेजमेंट बघून अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. तर नेटकऱ्यांनी महिलांच्या स्पिरिटची दाद देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()