नवी दिल्ली : देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या या सोहळ्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे आहेत. मॅक्रॉन कालच भारतात दाखल झाले आहेत.
त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावलेल्या UPI पेमेंटचा डेमो दिला. त्यासाठी त्यांनी आधी चहाच्या दुकाना चहा घेतला आणि मग पेमेंट केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video PM Modi took tea in a shop with French President Macron and made UPI payment)
चहाचा आस्वाद आणि युपीआय पेमेंट
पंतप्रधान मोदी अन् फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे दोघेही राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका चहाच्या दुकानात गेले. या ठिकाणी त्यांनी चहा मागवला आणि दुकानाच्या आवारात बसून दोघांची गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.
चहा घेतल्यानंतर पंतप्रधांनी आपल्या स्मार्टफोनमधून चहावाल्याला युपीआय पेमेंटही केलं. छोट्या छोट्या पेमेंटसाठीही युपीआय पेमेंट भारतात किती प्रभावी ठरलं आहे, याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी मॅक्रॉन यांना दिली.
पंतप्रधानांकडून युपीआयचं मार्केटिंग
दरम्यान, भारतानं विकसित केलेल्या या पेमेंट गेटवेचं एक प्रकारे पंतप्रधानांनी मार्केटिंग केलं आहे. फ्रान्समध्ये अद्याप युपीआयसारखी इन्संट पेमेंटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळं हे युपीआय पेमेंट गेटवे काम कसं करतं याची माहिती पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.