Viral Video: विधानसभेला रंगत! "मुझे माफ करना राहुल मेरे भाई..." भाजप नेत्याचा गाणं म्हणत काँग्रेसमध्ये प्रवेश, व्हिडिओ व्हायरल

Viral Video Of Rocky Mittal: 2014 मध्ये भाजपने निवडणुका जिंकल्या तेव्हा मित्तल यांनी 20 हजार लोकांना भव्य मेजवानी दिली होती.
Viral VIdeo Rocky Mittal Song On Rahul Gandhi
Viral VIdeo Rocky Mittal Song On Rahul GandhiEsakal
Updated on

नुकतेच हरियाणा आणि जम्म-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर काही दिवसांतच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे सध्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या पक्षांतराने जोर धरला आहे.

रॉकी मित्तल या नावाने प्रसिद्ध असलेले हरियाणवी गायक आणि संगीतकार जय भगवान मित्तल यांनी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रॉकी मित्तल यांनी कैथलमध्ये राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपचे माजी सदस्य आणि हरियाणाच्या विशेष प्रचार कक्षाचे अध्यक्ष मित्तल यांनी भाजपवर गैरवर्तनाचा आरोप केला. यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला.

यावेळी मित्तल यांनी "मुझे माफ करना राहुल मेरे भाई..." असे गाणं म्हणत काँग्रेस प्रवेश केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

व्हिडिओमध्ये खंत व्यक्त करताना रॉकीने सांगितले की, "14 वर्षे मी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात गाणी गायली. पण ते काही बोलले नाहीत, गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळे मला आता वाटू लागले आहे की मी चुकीचे करत होतो."

भाजपमध्ये असताना मित्तल यांच्यावर अनेक आरोप होते. मित्तल यांनी 2015 मध्ये कैथलमध्ये एका निदर्शनादरम्यान न्यायाधीशांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यात आले पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या घटनेनंतर त्यांचे भाजपपासूनचे अंतर वाढू लागले.

दरम्यान हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

2014 च्या निवडणुकीत मोदींसाठी 40 गाणी लिहिली

रॉकी मित्तल हे भाजपचे प्रसिद्धी सल्लागार होते. ते गाणी लिहायचे आणि स्वतःच गायचे. त्यांचे रॉकी मित्तल नावाचे यूट्यूब चॅनल आहे.

2014 मध्ये भाजपने निवडणुका जिंकल्या तेव्हा मित्तल यांनी 20 हजार लोकांना भव्य मेजवानी दिली होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी नरेंद्र मोदींसाठी 40 गाणी लिहिली होती. या गाण्यांच्या 3 लाख सीडी त्यांच्याच पैशातून वाटल्या होत्या.

पूर्वी ते स्वत:ला सर्वात मोठा 'मोदीभक्त' म्हणायचे. ते स्वत:ला ‘हिंदुस्थानी शेर’ही म्हणत.

Viral VIdeo Rocky Mittal Song On Rahul Gandhi
Smriti Irani Video: "त्यांनी यशाची चव चाखली..." कट्टर विरोधक स्मृती इराणींनी केले राहुल गांधींचे कौतुक; पाहा व्हायरल व्हिडिओ

आता भाजपवर आरोप

1 ऑगस्ट रोजी भाजप सोडताना रॉकी मित्तल यांनी भाजपसाठी निस्वार्थपणे काम केल्याचे म्हटले होते. मात्र त्यांच्या कामाकडे पक्षाने दुर्लक्ष केले. गेल्या चार वर्षांत आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप रॉकी यांनी केला आहे.

स्वत:ला 'मोदीभक्त' म्हणवून घेणारे रॉकी मित्तल पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात कशी गाणी काढणार? हे पाहण्यासारखे असेल.

Viral VIdeo Rocky Mittal Song On Rahul Gandhi
Nitin Gadkari: "गडकरींना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केले तर..." विधानसभेसाठी RSSचा नवा प्लॅन काय? व्हिडिओ रिपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.