Viral Video : केसांमध्ये गजरा नाही तर साप, अन् पडल्या सर्वांच्या नजरा, नेटकरी म्हणाले...

'त्या महिलेकडे नक्कीच नागमणी असेल. म्हणूनच हा साप तिच्या केसात तो शोधत आहे'
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video :  

लांबसडक केसांमध्ये गजरा घातलेली स्त्री अधिक सुंदर दिसते. गजऱ्यावरून अनेक गाणीही व्हायरल झाली आहेत. तुम्ही ‘केसामध्ये गजरा, पडती साऱ्यांच्या नजरा’ हे गाणेही ऐकले असेल. पण एका महिलेला पाहून तिने केसात गजरा नाहीतर साप, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, एका व्हायरल व्हिडिओमध्ये झोपलेल्या महिलेच्या केसात साप रेंगाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

Viral Video
Dombivli MIDC Blast : फेज २ मध्ये आगीच सत्र सुरुच, आणखी एका कंपनीला आग | video Viral

लोक सापांना सर्वात जास्त घाबरतात, कारण हा विषारी प्राणी एखाद्या व्यक्तीला चावतो आणि क्षणात मृत्यू होऊ शकतो. मात्र, तो साप किती विषारी आहे आणि तो कोणत्या जातीचा आहे, यावरही अवलंबून आहे. असाच एक साप महिलेच्या केसात फिरत आहे.  

काशिकायात्रा नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला दोन्ही हातांवर डोके ठेवून झोपलेली दिसत आहे. विशेष म्हणजे झोपलेल्या महिलेच्या डोक्यावर साप रेंगाळत आहे.

Viral Video
Pakistan Cricket:'बस्स झालं, देशाच्या भावनांचा सत्यानाश केला, टीमच बदला...', पाकिस्तान संघावर वसीम अक्रम भडकला; Video Viral

हा साप महिलेच्या केसांना वेटोळे घालून बसला आहे. तो पूर्ण केसांतून फिरतही आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 27 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 26 हजार युजर्सनी लाइक केले आहे. हा व्हिडिओ 1 लाख 28 हजाराहून अधिक इतर युजर्ससोबत शेअर करण्यात आला आहे. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स या व्हिडिओवर अतिशय हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा साप खरा आहे हे मान्य करायला अनेक युजर्स तयार नाहीत.

एका यूजरने लिहिले की, त्या महिलेकडे नक्कीच नागमणी असेल. म्हणूनच हा साप तिच्या केसात तो शोधत आहे. तर, ‘आम्ही बिहारचे लोक लहानपणापासून या सापांशी खेळत आहोत, हा साप चावत नाही आणि विषारीही नाही." असे एका व्यक्तीने लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.