Viral Video : दे धक्का! पठ्ठ्यांनी रेल्वेचा धक्का दिला अन् मोठा अनर्थ टळला, पहा व्हिडिओ

बिहारी तरूणांनी ट्रक,बसला नाही तर चक्क रेल्वेला धक्का दिला
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video :

मराठी चित्रटात धक्का देत टमटम सुरू केलेली आपण पाहिली आहे. मकरंद अनासपुरे यांचा कॉमेडी चित्रपट या टमटमभोवतीच फिरतो. आजही दे धक्का म्हणून बंद पडलेली बस, ट्रक, मोटारसायकल सुरू केली जाते. पण, आजपर्यंत कधीच घडलं नाही असं चित्र बिहारमध्ये पहायला मिळालं.

बिहारी तरूणांनी ट्रक,बसला नाही तर चक्क रेल्वेला धक्का दिला. त्यामुळे केवळ रेल्वे सुरक्षीत झाली नाही तर अनेक प्रवाशांचा जीवही वाचला.

Viral Video
Assam Fish Viral Video : चार डोळ्यांचा मासा पाहिलाय काय? आसामच्या पुरात सापडलेल्या 'या' माश्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील किउल जंक्शन रेल्वे स्थानकावर आगीपासून रेल्वेचे डबे वाचवण्यासाठी एकतेचे उदाहरण पाहायला मिळाले. लोकांनी मिळून ट्रेन रुळांवर ढकलली. त्यामुळे रेल्वेच्या अनेक बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावल्या.

आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारच्या लोकांच्या धाडसाचे आणि ऐक्याचे लोक कौतुक करत आहेत. गुरूवारी किउल स्टेशनवर पाटणा-जसीडीह मेमू ट्रेनला अचानक आग लागली.

Viral Video
Mohammed Shami: टीम इंडियात लवकरच होणार मॅच विनर गोलंदाजाचं पुनरागमन; सर्जरीनंतर जोरदार सरावाला सुरुवात; Video Viral

आगीमुळे इंजिन आणि दोन डब्यांनी पेट घेतला. आग इतर डब्यांना लागू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी पेटलेल्या आगीच्या डब्यांपासून संपूर्ण रेल्वे वेगळी केली. यानंतर स्थानकावर उपस्थित प्रवासी आणि इतर लोकांनी एकजूट दाखवून ट्रेनला ढकलून सुरक्षित स्थळी नेले.

रेल्वेला आग कशी लागली ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक मेमू ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत. पाटणाहून जसिडीहच्या दिशेने जाणारी मेमू पॅसेंजर ट्रेन किउल स्थानकावर थांबताच तिच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळ बाहेर पडायला सुरुवात झाली.

इंजिनला लागून असलेल्या दोन डब्यांनाही आगीने जळून खाक केले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी घाईघाईत संपूर्ण रेल्वे बाहेर काढली.

Viral Video
Viral Video : गायक अंकित तिवारीच्या कृतीचं होतंय कौतुक, गाणं थांबवत बेशुद्ध कॅमेरामनला पाजलं पाणी

यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तज्ज्ञांचे पथक तपास करत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.