Video: कुत्र्याला गाडीला बांधून क्रूरपणे फरपटत नेणाऱ्या गाडीचालकावर गुन्हा दाखल

कुत्र्याचा अमानूष छळ करण्यात आला आहे.
Viral video
Viral videoEsakal
Updated on

अनेकदा मुक्या प्राणी अत्याचाराच्या घटनांनी मन सुन्न होऊन जाते. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान राज्यातील जोधपूर शहरातील असल्याचे समजते. या घटनेत कुत्र्याचा अमानूष छळ करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कारच्या मागे धावणारा कुत्रा फारच थकलेला आहे. कार चालवणाऱ्या इसमाचे नाव डॉ. रजनीश गलवा असे सांगण्यात येत आहे. 

या व्हिडिओ असे दिसते आहे की एक कार रस्त्यावरुन धावत आहे. त्या कारच्या मागे कुत्राहा पळतांना दिसत आहे. पण तुम्ही जर का हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात येते की कुत्रा कारच्या मागे पळत नाही तर, त्याच्या गळ्यात साखळी बांधली आहे. ही साखळी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हातात आहे. ज्यामुळे कुत्रा कारच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो आहे. तो पळण्यापेक्षा जास्त त्या गाडीने खेचलाच जात आहे.

कुत्राला गाडीच्या वेगासोबत त्याच्या पळण्याचा वेग जुळवताना त्याची जिवाची खूप फजिती  होतांना आपल्या दिसत आहे. कारच्या वेगासोबत धावू न शकल्याने कुत्रा रस्त्यावर फरफटला जातो आहे. त्यामुळे त्याला अनेक ठिकाणी जखमाही झाल्या आहेत. 

Viral video
Dog Aggression: माणसाचे मित्र म्हणवणारे कुत्रे माणसावरच हल्ला का करतात, माहितीये?

डॉग होम फाउंडेशन नावाच्या सोशल मीडिया अकाउंटने केलेल्या ट्विटनुसार, या घटनेनंतर कुत्र्याला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक कार रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. त्या कारमागे कुत्र्याला पट्ट्याने ओढले जात आहे. हा कुत्रा जीवाच्या कराराने कारमागे धावताना दिसत आहे.

एका युजरने म्हटलंय, ‘कार चालवणारा ‘जनावर’ किती असंवेदनशील आहे.’ दरम्यान, कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने असे कृत्य का केले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. कुत्र्याला गाडीला बांधून क्रूरपणे फरपटत नेणाऱ्या गाडीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.