Viral Video: बाबो! महिलेने तलावात उतरून मगरीला खाऊ घातले मांसाचे तुकडे, खतरनाक व्हिडिओ!

Viral Video trending News: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क मगरीला खाऊ घालत असल्याचं दिसत आहे.
Viral News
Viral News
Updated on

नवी दिल्ली- जगात अनेक धोकादायक प्राणी आहेत. ज्याच्या जवळ जाण्यापासून आपण घाबरत असतो. मगर म्हटलं की तिचे मोठे मोठे दात आपल्यासमोर येतात. अशावेळी आपण ती लांबून जरी दिसली तरी जवळ जाणार नाही. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क मगरीला खाऊ घालत असल्याचं दिसत आहे.

मगरीच्या जवळ जाणे धोकादायक असते, आपला जीव देखील जाऊ शकतो. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारा व्हिडिओ वेगळं चित्र दाखवत आहे. महिला एका डबक्यात उतरते, त्याठिकाणी मगर असते. मगरीला जवळ घेऊन ही महिला तिला मासांचे तुकडे खाऊ घालते. यावेळी तिला कसलीही भीती वाटत नाही. सदर व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Viral News
ISKCON Viral Video: पाटण्याच्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त गर्दी, भाविकांवर पोलिसांना लाठीमार; पहा व्हिडिओ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.