Viral Video : बिर्याणीतला लेग पिस कुठाय रं; भर मांडवात खुर्च्या फेकून बिर्याणीवरून झाला राडा

लग्नात आलेली पाहुणे मंडळीही या भांडणात उतरली
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video :

एखाद्या लग्नात जेवणाच्या पंगती पडतात. पाहुणे मंडळी जेवायला जातात. तेव्हा कोणाला जास्त वाढलं अन् कोणाला कमी याची दबक्या आवाजात चर्चा होते. पण, एका लग्नात कमी जेवण वाढले म्हणून घमासान झाले. हा राडा इतक्या जोरात झाला की त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका लग्नात भांडणं झालेली दिसत आहे. लोक एकमेकांच्या अंगावर उड्या मारून, खुर्च्या फेकून, लाथा-बुक्क्यांचा प्रसाद देत आहेत. असे चित्र आहे. हा सरळा राडा फक्त लेग पिस साठी झाला आहे. नक्की हा प्रकार काय आहे पाहुयात.

Viral Video
Viral Video: 30 वर्षांपासून आज्जी करताहेत वारी; उत्साह, आनंद पाहुन म्हणाल, माऊली... माऊली...!

बिहारच्या बरैलीमध्ये एक विवाह सोहळा सुरू होता. लग्नाच्या पंगंती पडल्या आणि जेवणातल्या बिर्याणीत लेग पीसच सापडला नाही.  लग्नात आलेल्या पाहुण्यांनी यावर आक्षेप घेतला, त्यावर वधुपक्षाकडून वर पक्षाकडील लोकांना वाट्टेल ते सुनवले गेले.

अशा स्थितीत आधी बाचाबाची झाली आणि नंतर गोंधळ सुरू झाला. दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. लग्नात आलेली पाहुणे मंडळीही यात उतरली. या भांडणात हे लग्न पार पडणार की नाही याची शंका होती. कारण, नवरा मुलगाही या भांडणात होता. आणि ही भांडणं पाहून त्यानेही लग्नास नकार दिला.

Viral Video
Viral Video : हॉस्पिटल स्टाफने पडदा ओढून रूग्णासोबत केलं असं कृत्य, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले

शेवटी लग्न पार पडलं

वराने लग्नास नकार दिल्यानंतर लग्नाच्या मिरवणुकीत पूर्ण शांतता होती. मग झालं असं की, मुलीच्या बाजूच्या लोकांनी मुलाची बाजू पटवायला सुरुवात केली, त्यानंतर मुलाची बाजू लग्नासाठी तयार झाली. त्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि वराने वधूला निरोप देऊन आपल्या घरी नेले.

लोकांच्या म्हणण्यानुसार सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांना पाचारण केल्याचीही चर्चा होती, मात्र नंतर दोन्ही पक्षांमध्ये समेट झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Viral Video
Viral Video : कार्तिक देतोय कटोरीला चॅम्पियन बनण्याचे धडे ; व्हिडीओ झाला व्हायरल

अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार करण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची त्यांना माहिती नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()