Viral Video : अररर... कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला अन् कोल्हापुरकरांनी दिवसाढवळ्या...

कोल्हापुरात कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला अन् बघ्यांनी...
Viral Video
Viral Videosakal
Updated on

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक कोल्हापूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत कोल्ड्रींक घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरने पलटी मारली मात्र त्यावेळी तेथे जमणाऱ्या लोकांनी कोल्ड्रीक्सचे बॉक्सच पळवून नेले. ही संपुर्ण घटना एका व्हिडीओत कैद झाली आहे. (Viral Video when cold drinks truck overturned kolhapur people rush on it)

Viral Video
Divyanka's Viral Video : टीव्हीवरील संस्कारी सूनेचा दबंग अंदाज भन्नाट व्हायरल! बघा व्हिडीओ

गोव्याकडे जाणारा कोल्ड्रींक्सचा एक कंटेनर आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात पुईखडी  घाटात उलटला. यावेळी ट्रकचालकाची एकच तारांबळ उडाली मात्र जमलेल्या लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी कोल्ड्रीक्सच्या बाटल्या पळवल्या.

Viral Video
Viral Video : इस्रायलच्या ज्यू व्यक्तीनं गायलं शिवरायांवर मराठी गीत, "अशीच आमुची.. "

पडलेल्या कोल्ड्रींक्सच्या बाटल्या उचलण्यासाठी लोकांनी तिथे खूप गर्दी केली. ही बातमी आजूबाजूच्या गावात पसरताच लोक सुद्दा बाटल्या पळवायला गर्दी करत होते. काही लोकांनी तर दुचाकीवर पोती भरून बाटल्या पळवून नेल्या. या दरम्यान त्या रस्त्यावर मोठा प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे या बाटल्या पळवण्यासाठी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकही दिसले.

Viral Video
Viral Video : याला म्हणतात राजामाणूस! गाडीच्या टपावर बसून कुत्रा करतोय तोऱ्यात प्रवास

तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून हसावं की ट्रक चालकासाठी रडावं असं वाटेल. मात्र कोल्हापूरकरांनी ज्या प्रकारे ट्रक चालकास लुटले, ते खरंच पाहण्यासारखे आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()