Viral Video : भांडी धुतल्यासारखे या महिलेने साबणाच्या पाण्यात बुचकळले पिस्तुल,व्हिडिओ व्हायरल झाला अन् पोलिसांनी...

केवळ एकच नाही तर तीन-चार पिस्तुलं तिच्याजवळ दिसत आहेत. ही घटना कुठली आहे जाणून घेऊयात
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Madhya Pradesh Chambal Viral Video :

आपल्या देशात पिस्तूल, कट्टा, तलवार अशी हत्यार बाळगणं हा गुन्हा आहे. त्यामुळे हत्यार घरात ठेवण्याचा कोणी विचार करत नाही. पण, जरी कोणत्या कारणामुळे हत्यार असलं तरी ते लपवून ठेवलं जातं. पण देशातील काही राज्य अशी आहेत जिथे हत्यारं उघडपणे वाईट कामांसाठी वापरली जातात.

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला पाण्यात बुडवून भांडी घासतो तसे ब्रशने घासून पिस्तूल साफ करत आहे. केवळ एकच पिस्तूल नाही. तर तीन-चार बंदुका तिच्याजवळ दिसत आहेत. ही घटना कुठली आहे जाणून घेऊयात. (Viral Video)

Viral Video
धक्कादायक! बुद्धीबळपटूची डेंजर 'चाल'; प्रतिस्पर्धीचा काटा काढण्यासाठी 'विषारी' डाव Video Viral

मध्यप्रदेशातील चंबळचे खोरे दरोडा,चोरी, खून, वाटसरूंची लुट अशा घटनांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे घराघरात पिस्तूल आढळतात. हा परिसर डाकूंसाठी प्रसिद्ध आहे. याच खोऱ्यात फुलनदेवीसुद्धा त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे डाकू बनल्या होत्या.

चंबळ प्रदेशात ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण याआधी एकतर शस्त्रास्त्र विक्रेत्यांचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा, किंवा गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा. पिस्तूल धुण्याचा हा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला देशी बनावटीचे पिस्तूलं पाण्यात धुताना दिसत आहे. महिला ब्रशने बंदुका साफ करताना दिसली. मुरैना जिल्ह्यातील महुआ पोलिस स्टेशन अंतर्गत गणेशपुरा गावात ही घटना घडली. (Viral video of woman washing pistols in MP)

सरताज लेखक नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. साबणाच्या टपात देसी कट्टा धुणारी एक अबला नारी, असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. (Viral Video )

Viral Video
Kishor Darade viral video: सायरन वाजवणाऱ्या शिंदेंच्या आमदाराला पुणेकरानं भररस्त्यात झापलं, नेमकं काय घडलं?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी हे घर शोधून काढून घरातील पिस्तुलांचा कारखाना चालवणाऱ्या बाप-लेकाला ताब्यात घेतले आहे. हे बाप-लेक मिळून इथे शस्त्र बनवण्याची फॅक्टरीच चालवत होते.

या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती घेऊन. व्हिडिओचा पाठपुरावा करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली आहे, असे मुरैना अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()