Viral Video : मोदींच्या कॅबीनेट मंत्र्यांना लिहिता आलं नाही 'बेटी बचाव बेटी पढाओ'; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

savitri thakur viral Video : सावित्री ठाकुर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून यावर जोरदार टीका केली जात आहे.
union minister of state savitri thakur viral Video
union minister of state savitri thakur viral Video

union minister of state savitri thakur viral Video : केंद्रातील मोदी सरकारमधील राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही घोषणा बोर्डावर लिहीता आली नाही. याचा व्हिडीओ काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात तीन दिवसांचा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांना बोलवण्यात आले होते. कार्यक्रमात शाळकरी मुलांचे स्वागत केल्यानंतर शिक्षा रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाणार होते. त्याआधी रथावर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर सावित्री छाकूर यांना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे स्लोगन लिहायचे होते. मात्र त्यांनी 'बेढी पडाओ बच्चाव' लिहीलं.

union minister of state savitri thakur viral Video
Hajj Pilgrims: भीषण उष्णता बनली प्राणघातक! 550 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू, अनेकांवर उपचार सुरु

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती या घटनेचा व्हिडीओ शेअर करत आहेत. मंत्री ठाकूर यांनी लिहीलेल्या स्लोगन फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत.

union minister of state savitri thakur viral Video
Nalanda University: इसवीसन 427 मध्ये स्थापना..जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र असलेले 'नालंदा' 700 वर्षांनी नामशेष कसे झाले?

सावित्री ठाकुर कितवी शिकल्यात?

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, धारच्या खासदार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकुर या १२वी पास आहेत. त्या दुसऱ्यांदा धार लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत.त्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नव्हता. पती शेतकरी तर वडील सरकारी कर्मचारी आहेत. सावित्री ठाकूर या संघाशी संबंधित आहेत आणि त्या परिसरात सक्रिय आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com