जगभरात सुमारे तासभर व्हॉटसअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले. यादरम्यान वापरकर्त्यांना मॅसेज पाठवता येत नव्हते. मेटा कंपनीने स्पष्ट केले आहे की ते व्हॉटसअॅप वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर काम करत आहेत आणि त्यानंतर काही वेळात सेवा पुर्ववत देखील करण्यात आली. दरम्यान या सगळ्यामध्ये त्रस्त युजर्स व्हॉटसअॅप डाउनबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सचा सोशल मिडीयावर महापूर आल्याचे पाहायला मिळाले. या मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
चला काही मजेदार मीम्स पाहूया
बऱ्याच नेटकऱ्यांना ट्विटरवर आल्यानंतर व्हॉटसअॅप डाऊन असल्याचे समजले, त्यानंतर याबद्दल देखील बऱ्याच मीम्स पोस्ट करण्यात आल्या आहेत
अनेकांनी त्यांचे फोन रिस्टार्ट कले प्लॉइट मोडवर ठेवले तरीही व्हॉट्सअॅप चालत नव्हतं
मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गचे फोटो वापरून तयार केलेल्या मीम्स पाहून हसू आवरने कठीम होतं
व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर लोक याची चांगलीच मजा घेत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.