Khadija Shah : ही फॅशन डिझायनर आहे लाहोरच्या जिन्ना हाऊस अटॅकची मास्टर माइंड?

9 मे रोजी झालेल्या हिंसाचारात लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाउस (जिना हाऊस) वर झालेल्या हल्ल्यातील ती मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे.
Khadija Shah
Khadija Shah esakal
Updated on

Khadija Shah : पाकिस्तानची प्रसिद्ध फॅशन डिझायनर खादिजा शाह सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी खदिजा शाहला अटक केली आहे. 9 मे रोजी झालेल्या हिंसाचारात लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाउस (जिना हाऊस) वर झालेल्या हल्ल्यातील ती मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे.

जिओ न्यूजनुसार, खादिजा शाहला अटक करण्यात आली आहे. याआधी खादिजाने ती स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. पण तिने तसे केले नाही. खादिजाच्या पतीसह इतर कुटुंबियांनाही अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर पीटीआय समर्थकांनी देशभरात निदर्शने केली. यादरम्यान संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. काही लोकांनी लाहोरमधील जिना हाऊस आणि इतर लष्करी कार्यालयांनाही टार्गेट केले आहे. पाकिस्तानी लष्कराने जिना हाऊसवरील हल्ल्याचा मास्टर माईंड खादिजा शाहला असल्याचे सांगितले होते.

Khadija Shah
Khadija Shah

या हिंसाचारानंतर पंजाब प्रांताचे प्रोव्हिजनल मुख्यमंत्री मोहसिन नकवी यांनी 9 मे रोजी लष्करी प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या महिलांना कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल, असे सांगितले होते. काही दिवसांनी खादिजा शाहचा एक ऑडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

गेल्या काही दिवसांत तिच्या कुटुंबाला किती अडचणींचा सामना करावा लागला हे खादिजाने व्हिडिओमध्ये सांगितले होते. तिने सांगितले होते की ती पीटीआय समर्थक आहे आणि लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊसच्या बाहेरील निदर्शनाचा भाग होती, परंतु लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त करणे यासह कोणत्याही चुकीच्या कृत्यात ती सहभागी नव्हती. असे तिने सांगितले होते.

khadija Shah
khadija Shah

खदिजा शाह एक डिझायनर आहे. ती इम्रानच्या पीटीआय या पक्षाची समर्थक आहे. इतकेच नाही तर ती पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख ख्वाजा आसिफ जंजुआ यांची नात आहे. खदिजा ही सलमान शाहची मुलगी आहे. ते माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या वित्त संघाचे सदस्य होते आणि उस्मान बुजदार सरकारच्या काळात त्यांनी पंजाब सरकारचे सल्लागार म्हणून काम केले होते.

Khadija Shah
Imran Khan : देशद्रोहाचा खोटा आरोप लावून मला दहा वर्षे तुरुंगात टाकण्याचा कट; इम्रान खान

खादिजा शाहने रविवारी ऑडिओ जारी करून आपली चूक मान्य केली होती आणि ती पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. रागाच्या भरात आणि भावनेच्या भरात आपण लष्करी नेतृत्वाविरोधात चुकीचे ट्विट केल्याचेही तिने मान्य केले होते, मात्र आता हे ट्विट काढून टाकण्यात आले आहेत. ते म्हणाले होते की, गेले ५ दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. प्रशासनाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून तिचे वडील आणि पती यांचे अपहरण केल्याचा दावा तिने केला. त्यांनी आमच्या मुलांसमोर माझ्या पतीला मारहाण केली. माझ्या घरातील नोकरांचाही छळ झाला. असेही तिने सांगितलेय. (Pakistan)

Khadija Shah
Lahore Blast : लाहोरमधील बॉम्बस्फोटात आठ ठार तर, 24 गंभीर

तिने घटनेच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचा दावा खादिजाने केला होता. मात्र, गेल्या वर्षी तिने पीटीआयच्या अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. तिच्याकडे दुहेरी नागरिकत्व असून ती दूतावासाकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने उघड केले. (Attack)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.