Swami Chakrapani : 'चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा' म्हणणारे स्वामी दाऊदच्या कारमुळे झाले होते फेमस

कोरोना व्हायरल हा एक अवतार, दाऊद सुलभ शौचालय असे वक्तव्य करणारे आणि दाऊदची गाडी जाळणारे हे स्वामी
Swami Chakrapani
Swami ChakrapaniSakal
Updated on

भारताने चंद्रावर यान उतरवून जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगात पहिला देश आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून भारताने मान मिळवला पण चांद्रयानाच्या यशानंतर चर्चांना उधाण आलं आहे. 'चंद्राला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करा' अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे.

चांद्रयानाच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर चांद्रयान - ३ ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' आणि चांद्रयान २ ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्या ठिकाणाला 'तिरंगा' असं नाव देण्यात आल्याची घोषणा मोदी यांनी केली होती.

त्याचबरोबर २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल असंही ते म्हणाले. पण चंद्राला हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करा म्हणणारे स्वामी चक्रपाणी यांच्यासंदर्भात तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात...

Swami Chakrapani
Sangali Lezim Video : जल्लोषाची लेझीम! सांगलीतील विसावा मंडळाचा लेझीम सराव एकदा पाहाच

स्वामी चक्रपाणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष तर आहेतच पण ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातही कायम चर्चेत असतात. कोरोना, दाऊद, राहुल गांधी, हिंदुत्व, चंद्र अशा विविध विषयांवरील त्यांचे वक्तव्य वादात सापडले आहेत.

"कोरोना व्हायरस हा एक अवतार आहे तो मांसाहारी लोकांना शिक्षा देत आहे"

कोरोना काळात स्वामी चक्रपाणी यांनी अजब वक्तव्य केले होते. "कोरोना व्हायरस हा देवाचा अवतार आहे, तो चीनला धडा शिकवत आहे आणि जे लोकं मांसाहार करतात त्यांना शाकाहारी बनण्याचा संदेश देत आहे. गोमूत्र आणि गायीच्या शेणापासून कोरोना बरा होऊ शकतो. गोमुत्र पिल्याने आणि गायचे शेण शरिराला लावून 'ओम नम: शिवाय'चा जप केल्याने कोरोनापासून मुक्ती मिळेल" असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

"दाऊदची गाडी खरेदी करून लावली आग"

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दाऊद आणि छोटा शकील यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर स्वामी चक्रपाणी यांना केंद्र सरकारने झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली होती. २०१६ मध्ये महाराजांच्या मोबाईलवर छोटा शकीलच्या धमकीचा मेसेजही आला होता. त्यानंतर काही दिवसांत त्यांनी अंडरग्राऊंड दाऊद इब्राहिम याची गाडी ३२ हजार रूपयांत खरेदी करून तिला आग लावली होती. दाऊदच्या गाडीला आग लावून त्यांनी दहशतवादाला जाळल्याचं प्रतिकात्मक रूप दाखवलं होतं.

Swami Chakrapani
गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, अंगावर भगवे कपडे अन् हातात झांज; ठाकरेंच्या सभेनंतर बांगरांची कावड यात्रा | Santosh Bangar Video

दाऊद सुलभ शौचालय

दाऊदची कार जाळल्याच्या नंतर २०१८ मध्ये त्यांनी अजून एक वक्तव्य केलं होतं. "दाऊदचं घर खरेदी करून त्याला दाऊद सुलभ शौचालय बनवणार आहे" असं वक्तव्य करणाऱ्या स्वामींनी दाऊदच्या घराच्या बोलीमध्ये सहभाग घेतलाच नाही. त्यानंतर आसाराम बापू यांच्या समर्थनार्थसुद्धा ते पुढे आले होते. आसाराम बापू यांना षडयंत्र रचून फसवलं गेल्याचं मत चक्रपाणी यांनी व्यक्त केलं होतं.

त्यांचे विवादास्पद वक्तव्य आहेत चर्चेत

"राहुल गांधी समलैंगिक आहेत असं आम्ही ऐकलं आहे, धार्मिक आस्थासाठी अभिनेत्री झायरा वसीमने फिल्म सोडली हे प्रशंसनीय आहे, हिंदू अभिनेत्रींनीसुद्धा झायरा पासून प्रेरणा घेतली पाहिजे. 'मी केरळमध्येही मदतीचे आवाहन करतो पण निसर्गाचा आणि प्राण्यांचा आदर करणाऱ्या लोकांनाच मदत केली पाहिजे."

"केरळच्या लोकांना जेव्हा रोटी उपलब्ध होती तेव्हा ते गाईचे मांस मारत होते. त्यामुळे जे गोमांस खाणे टाळतात त्यांनाच हिंदूंनी मदत करावी." असे अनेक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी याआधी केलेले आहेत. आपल्या अशा वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.