नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस बल अर्थात सीआरपीएफ जवानाची बायको आणि टोल नाक्यावरील महिला कर्मचारी यांच्यामध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या टोल नाक्यावर बुधवारी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या महिलांनी एकमेकींचे केस ओढून आपला राग व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.