Viral Post : ही नेमकं करते तरी काय? महिलेने तीन तासात कमवले 4.4 लाख रुपये; तुफान व्हायरल होतोय स्क्रीनशॉट

viral social media post : आपल्यापैकी अनेक जण आठ ते नऊ तासांची नोकरी करत असतात. बऱ्याच जणांना या नोकरीच्या मोबदल्यात पुरेसे पैसे मिळत नसल्याची तक्रार असते.
viral social media post
viral social media post
Updated on

आपल्यापैकी अनेक जण आठ ते नऊ तासांची नोकरी करत असतात. बऱ्याच जणांना या नोकरीच्या मोबदल्यात पुरेसे पैसे मिळत नसल्याची तक्रार असते. यादरम्यान सोशल मीडियावर श्वेता कुकरेजा नावाच्या एका महिलेने दावा केला आहे की, तीने फक्त तीन तास काम करून ४,४०,००० रुपये कमवले आहेत.

श्वेता कुकरेजा नावाच्या युजरने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे, ज्यामध्ये ४,४०,००० रुपयांचे क्रेडिट दिसून येत आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत त्या महिलेने लिहीले की, क्लायंटने मला फक्त तीन तास काम केल्याबद्दल ५,२०० डॉलर म्हणजेच ४,४०,००० रुपये दिले. मला फक्त त्याच्या सोशल मीडिया स्ट्रॅटजीवर काम करायचे होते.

कुकरेजा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, या महिन्यात एका क्लायंटने फक्त तीन तासांच्या कामाचे ४,४०,००० रुपये दिले. असे दिवस काम करण्याचं समाधान आणि मेहनतीचा खरा परतावा देतात.

viral social media post
Baramati Murder : बारामती हादरली! १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून

त्यांनी पुढे लिहीलं की, माझी फी ही माझ्या एक्सपर्टीजवर आधारित आहे, काम करण्यासाठी लागलेल्या तीन तासांवर नाही. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर क्लायंट्स वेळेएवजी माझ्या एक्सपर्टीजसाठी पैसै मोजतात. जर त्यांना फक्त तीन तासांच्या हिशोबाने पैसे द्यायचे असते तर हे काम खूप स्वस्तात झाले असते.

या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, ज्यापैकी अनेक जण त्यांच्या कामाची खासीयत काय ते विचारत आहेत. अनेकांना तीन तासांसाठी काम करून मिळालेल्या फी बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकांनी कमेंट करत एखाद्या फ्रेशरचा सीटीसी देखील याहून कमी असल्याचे म्हटले आहे.

कुकरेजा या सोशल मीडिया एक्सपर्ट आहेत आणि क्लायंट्सची पर्सनल ब्रँडिंग सुधारण्यासाठी मदत करतात. त्यांच्या सक्सेस स्टोरीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

viral social media post
Vidhansabha Election : फक्त मुख्यमंत्रीपद नव्हे १०० जागाही... विधानसभेसाठी काँग्रेस का करतेय इतक्या मागण्या?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.