Employee Layoff Viral Video : चूक कोणाची ? नोकरीवरून काढल्यानंतर ढसाढसा रडली तरूणी ; CEO वर भडकले नेटकरी

सध्याच्या काळात नोकरी मिळवणे हे अतिशय अवघड झाले आहे. शिवाय, तुम्हाला मिळालेली नोकरी टिकवून ठेवणे हे त्याहून अधिक कठीण काम आहे.
Employee Layoff Viral Video
Employee Layoff Viral Videoesakal
Updated on

Employee Layoff Viral Video : सध्याच्या काळात नोकरी मिळवणे हे अतिशय अवघड झाले आहे. शिवाय, तुम्हाला मिळालेली नोकरी टिकवून ठेवणे हे त्याहून अधिक कठीण काम आहे. मागील काही दिवसांपासून काही कंपन्या त्यांच्या कंपनीमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे.

अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील एका महिला कर्मचारीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर, तिने एक स्वत:चा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तिने तिला कामावरून काढून टाकल्याचा अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Employee Layoff Viral Video
अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात गेली अन् धक्क्याने जिवंत झाली 'मृत' व्यक्ती! हरियाणातील घटनेने डॉक्टरही चकित

हा व्हिडिओ सर्वात आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर, तो इतर सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. या महिला कर्मचारीचे नाव ब्रिटनी पिएश असे असून तिने हा ९ मिनिटांचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये सुरूवातीला ब्रिटनी नावाची तरूणी रडताना दिसत आहे. त्यानंतर, तिला एचआरचा कॉल येतो.

हा कॉल आल्यानंतर तिला एचआर सांगते की, 'आम्ही २०२३ च्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे आणि त्यात तुमची कामगिरी कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही. त्यामुळे, तुम्हाला कामावरून काढण्यात आले आहे. यावेळी ब्रिटनी एचआरला सांगते की, मी २५ ऑगस्टला नोकरीला सुरूवात केली. मी ३ महिन्यांच्या पिरियडवर होते. मी माझ्या टीममध्ये सर्वाधिक काम केले.

ती पुढे म्हणते की, तिला तिच्या कामाबद्दल तिच्या मॅनेजरकडून सतत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मग तरी तिला नोकरीवरून का काढण्यात आले'? तिच्या या प्रश्नावर एचआरला ही व्यवस्थित उत्तर देता येत नाही.

त्यानंतर, ब्रिटनी रडते आणि म्हणते की, तुमच्यासाठी लोकांना कामावरून काढून टाकणे सोपे आहे. तुम्ही १०-१५ मिनिटांमध्ये एखाद्याला सांगता की, तुम्हाला आता कामावरून काढून टाकण्यात आले आहे. परंतु, यामुळे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठे वादळ निर्माण होते, याचा तुम्हाला अंदाज आहे का? मात्र, तुमच्याकडे एखाद्याला कामावरून काढून टाकण्याचे योग्य कारण देखील नाही, असे ती व्हिडिओमध्ये बोलताना दिसते.

खरं तर ब्रिटनीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर Cloudflare कंपनीचे सीईओ मॅथ्यू प्रिन्स म्हणाले की, 'हा व्हिडिओ पाहणे माझ्यासाठी वेदनादायक आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला कारण नसताना कधीच काढण्यात आलेले नाही. असे निर्णय घेताना व्यवस्थापकाने एचआरचीही साथ द्यायला हवी.

ज्यांना कामावरून काढले जाते, ते कर्मचारी काही वाईट नाहीत. त्यावेळी, कंपनीकडे त्यांच्यासाठी कोणतेही काम नसते. त्यामुळे, त्यांना कामावरून काढले जाते. मात्र, भविष्यात कंपनी अधिक चांगले काम करेल', अशी ग्वाही देखील मॅथ्यू यांनी दिली आहे. दरम्यान, ब्रिटनीच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत असून तिला पाठिंबा दर्शवत आहेत. दुसऱ्या बाजूला नेटकरी सीईओंवर चांगलेच भडकले आहेत.

Employee Layoff Viral Video
Plane Viral Video: ...अन् त्याने पळत जाऊन पायलटला केली धक्काबुक्की...इंडिगो फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ; Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com