गेमच्या नावाखाली बायकोला मित्रांसमोर कपडे उतरवायला लावले.. पायलट नवऱ्याचा पराक्रम

ट्रूथ ओर डेयर... हा खेळ तुम्ही सर्वांनी ऐकला अन् खेळलादेखील असेल. परंतु या गेमच्या नावाखाली धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर
 गेमच्या नावाखाली बायकोला मित्रांसमोर कपडे उतरवायला लावले.. पायलट नवऱ्याचा पराक्रम
Updated on

ट्रूथ ओर डेयर... हा खेळ तुम्ही सर्वांनी ऐकला अन् खेळलादेखील असेल. परंतु या गेमच्या नावाखाली धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. गेमच्या नावाखाली बायकोला मित्रांसमोर कपडे उतरवायला लावल्याची घटना घडली आहे.

या घटनेची सुरुवात उत्तराखंडमधील डेहराडून येथुन सुरु होते. 2011 मध्ये सामाजिक कार्यक्रमादरम्यान जेव्हा अलिशा (नाव बदलले आहे) अभय (नाव बदलले आहे) भेटातात तेव्हा ते दोघे पहिल्या नजरेतच प्रेमात पडतात.

अलिशा व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून काम करत होती आणि अभय आंतरराष्ट्रीय एअरलाइनमध्ये पायलट होता. दोघे आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2019 मध्ये अभय आणि अलिशा यांचे लग्न झाले आणि दोघेही कोलकाता येथे आले. काही दिवस इथे राहिल्यानंतर दोघेही मुंबईला शिफ्ट झाले.

मुंबईत सुरु झाला डर्टी गेम

अलीशाला मुंबईतील चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून काम मिळाले. काही काळ दोघांमध्ये सर्व काही सुरळीत राहिले, पण त्यानंतर सर्व काही बदलू लागले. अभय अनेकदा त्याच्या मित्रांना पार्टीसाठी घरी बोलवायचा आणि मग ट्रुथ ऑर डेअर गेम खेळायचा.

एकदिवशी हा गेम सुरु असताना अभय अलिशाला त्याच्या मित्रांसमोर त्याच्या अश्लील मागण्या पूर्ण करण्यास सांगतो. खरे तर खेळादरम्यान जेव्हा जेव्हा बाटलीचे तोंड अलिशाच्या दिशेने थांबायचे तेव्हा अभय तिच्या मित्रांसमोर हिंमतच्या नावाखाली तिला कपडे काढायला सांगायचा.

कपडे काढण्यास नकार दिला तर मारहाण करायचा

सुरुवातीला अलिशाला वाटले की तिचा नवरा मस्करी करतोय, पण जेव्हा अभयने जबरदस्तीने तिला तसे करण्यास सांगितले तेव्हा तिला सत्य समजले. अलिशाने जेव्हा मित्रांसमोर कपडे काढण्यास नकार दिला तेव्हा अभय तिला मारहाण करायचा. अलिशा पाच वर्षे ही क्रूरता सहन करत राहिली. जेव्हा जेव्हा ती याविरुद्ध बोलायची तेव्हा तिला अत्याचार सहन करावा लागत असत.

जेव्हा दोघेही गुजरातमधील खोरज येथे शिफ्ट झाले तेव्हा अलीशाने ठरवले की, ती आता गप्प बसणार नाही. याप्रकरणी अलिशाने गुजरातच्या अडालज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलीस काय म्हणाले?

अलिशाने तिच्या तक्रारीत अभय केयूवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अडालज पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर केबी शंखला यांनी सांगितले की, त्यांना महिलेची तक्रार मिळाली आहे. 2019 पासून तिने पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून लवकरच जबाब नोंदवले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()