गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

Siliguri Police Viral Video: सिलीगुडीमधील एका महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या एका महिलेचे चुंबन घेताना दिसत आहे.
Siliguri Police Viral Video
Siliguri Police Viral VideoESakal
Updated on

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी गस्त घालत असताना रस्त्यावर एका महिलेचे चुंबन घेताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पदावर तैनात असलेल्या तान्या रॉय असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

Siliguri Police Viral Video
Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सिलीगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी गुलाबी रंगाची पोलीस व्हॅन तैनात केली आहे. बुधवारी रात्री गुलाबी व्हॅनने गस्तीवर असताना एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर स्थानिक महिला घटनास्थळी जमा झाल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच या महिलांनी गाडी चालवत असताना पोलीस कर्मचारी मद्यधुंद असल्याचा आरोप केला. यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे दाखवण्यासाठी एका महिलेला जवळ ओढले. त्यानंतर हे कृत्य केले आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हायरल केला आहे. दरम्यान याआधी तान्या रॉय यांची दारूच्या नशेत कर्तव्य बजावल्याप्रकरणी पोलीस लाईनमध्ये बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रधान नगर पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, तान्या रॉय नशेत असताना त्यांनी कर्तव्य बजावल्याबद्दल आधीच त्या चौकशीत होत्या. सुरुवातीला शिस्तभंगाचा उपाय म्हणून पोलीस लाइनमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र जेव्हा त्या या आठवड्यात कर्तव्यावर पुन्हा रुजू झाल्या. तेव्हा पुन्हा त्यांनी हेच केले आहे. ज्यामुळे तिला त्वरित निलंबित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.