Viral : तुम्ही नोकरी दिली नाही, तर मी प्रियसीशी लग्न करू शकणार नाही, पठ्ठ्यानं कंपनीलाच केला मेल!

13 जून रोजी शेअर केल्यापासून, X वर ही पोस्ट 2.27 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे
Viral
Viral esakal
Updated on

Viral :

एखाद्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी सर्वात आधी तुमचे ऍप्लिकेशन द्यावे लागते. त्यामध्ये तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमचा Resume असतो. काही लोक केवळ रिझ्युमेवर सिलेक्ट होतात. तर काही लोक या परीक्षेत नापास होतात. आपण सिलेक्ट होणार नाही, याची भिती वाटल्याने एका तरूणाने कंपनीला मेल केला आहे. तो मेल आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

बजाज कंपनीत इंजिनीअर पदासाठी भरती सुरू होती. तेव्हा कंपनीच्या मेल बॉक्समध्ये एक मेल येऊन पडला. कंपनीने तुमचीच निवड का करावी, यावर एका उमेदवाराने भन्नाट उत्तर दिले आहे. हे उत्तर अर्वा हेल्थच्या संस्थापक आणि सीईओ दिपाली बजाज यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Viral
Italy Parliament Viral Video : G-7 परिषदेपूर्वी इटलीच्या संसदेत हाणामारी; नेमका प्रकार काय?

या उमेदवाराने स्वत:ची निवड करण्यासाठी असे लिहीले आहे की, मला या नोकरीची अत्यंत गरज आहे. कारण, मला माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीशी लग्न करायचे आहे. माझ्याकडे नोकरी नसेल तर माझे तिच्याशी लग्न होऊ शकत नाही.

तो उमेदवार पुढे म्हणतो की, मला नोकरी नसल्याने माझ्या लग्नात अडथळा येत आहे. माझ्या प्रियसीच्या वडीलांची इच्छा आहे की, चांगली नोकरी असलेल्या मुलाशीच माझ्या मुलीचे लग्न लागेल. त्यामुळे, मला नोकरीची गरज आहे.

Viral
Viral Video : 'अंगारो' गाण्यावर साईशाचा बहिणीबरोबर धमाल डान्स ; नेटकरी म्हणाले...

या उमेदवाराला जेव्हा विचारण्यात आले की, 'तू या भूमिकेसाठी का फिट आहेस?' त्यावर त्यांनी लिहिले की, 'मला विश्वास आहे की मी या पदाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो.

दिपाली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या ऍप्लिकेशनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 'एखाद्याला नोकरी देणे हे देखील मजेदार असू शकते, असे त्यांनी लिहीले आहे.

13 जून रोजी शेअर केल्यापासून, X वर ही पोस्ट 2.27 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि चार हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मुलगा प्रामाणिक असला पाहिजे, खरी गोष्ट अशी आहे की एचआर पुढील फेरीसाठी त्याचा विचार करत आहे.

'दुसरा युजर म्हणाला, इजिनिअर्स सर्जनशील असले पाहिजेत. त्यांना जास्त पगार मिळण्याची आणि लग्न करण्याची काळजी असते. तिसरा युजर लिहितो, 'दोन प्रेमींना एकत्र आणा आणि या मुलाला नोकरी द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.