Viral Video: "माझ्यासमोर चालणार नाही," शर्ट काढून मसल्स दाखवणाऱ्याला महिलेने मुस्काडले; पाहा व्हिडिओ

Women Slaps Youth: आता इन्स्टाग्रामवर गेल्या आठवड्यापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्यावर महिलेशी गैरवर्तणूक करणाऱ्या तरुणाला ही महिला कानशिलात लगावताना दिसत आहे.
Woman Slaps Youth For Showing Muscles Video
Woman Slaps Youth For Showing Muscles VideoEsakal
Updated on

सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स या प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला सतत नवनवी व्हिडिओज, रिल्स पाहायला मिळत असतात. यामध्ये काही व्हिडिओज, रिल्स गमतीशीर असतात तर काही गंभीर.

आता इन्स्टाग्रामवर गेल्या आठवड्यापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्यावर महिलेशी गैरवर्तणूक करणाऱ्या तरुणाला ही महिला कानशिलात लगावताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक जोडपं चालताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक मुलगा त्यांच्या समोर येतो, शर्ट काढतो आणि बायसेप्स दाखवायला लागतो. यावर जोडप्यापैंकी असलेला तरुण संतापतो.

यानंतर बायसेप्स दाखवणाऱ्या तरुणाच्या कृत्यामुळे अस्वस्थ झालेली महिला त्याला चापट मारू लागते. महिलेने रागाने त्याला असे का केला याचा जाब विचारत आणखी काही चापटी मारल्या. ती म्हणाली, "तो शर्ट घाल व जा आणि हे शरीर दुसरीकडे कुठेतरी दाखव."

Woman Slaps Youth For Showing Muscles Video
Viral Video: डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेत तरुणीचा डान्स; सोशल मीडियावर चर्चेला फुटलं तोंड; पाहा व्हिडिओ

सोशल मीडिया युजर्सना व्हिडिओबाबत शंका

दरम्यान हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर युजर्स यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये काहीजण महिलेचे कौतुक करत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ व्हिव्ज मिळवण्यासाठी व्हिडिओतील सर्वांनी लिहिलेली स्क्रीप्ट आहे.

आतापर्यंत इन्स्टाग्रमवर 3 लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 18 हजार जाणांनी लाइक केले आहे. दरम्यान हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून यावर हजारो युजर्स यावर कमेंट करत आहेत.

Woman Slaps Youth For Showing Muscles Video
Trending : ह्योच माझा नवरा!  पोलिस ठाण्याच्या आवारात दोन महिलांमध्ये जुंपली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.