Viral Video : मुलगा 'अ‍ॅनिमे पॉर्न' पाहताना सापडला, आईने थेट टीव्हीच फोडला; व्हिडिओ होतोय व्हायरल

ट्विटरवर या व्हायरल व्हिडिओला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
Viral Video
Viral VideoeSakal
Updated on

तरुण मुलांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. सरकारने मोठ्या प्रमाणात पॉर्न साईट्स बॅन केलेल्या असूनही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने मुलांपर्यंत ते पोहोचतंच. मुलं अशा गोष्टी पाहत असल्याचं दिसल्यास कोणत्याही पालकांना संताप येणं साहजिक आहे. अशाच एका संतापलेल्या आईची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

मॅजिकपिन या कंपनीने एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी आपल्या घरातील 'कडक' भांडण सांगा, असं आवाहन ट्विटर यूजर्सना केलं होतं. आम्ही त्यावर एकदम कडक उपाय सांगू, आणि सर्वात खतरनाक किस्सा ज्याचा असेल, त्यांना 'चायोस' कंपनीचा एक वर्ष पुरेल एवढा कडक चहा मिळेल; असं यात म्हटलं होतं.

यावर प्रतिक्रिया म्हणून घर के कलेश नावाच्या यूजरने एका घरातील भांडणाचा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या घरातील टीव्ही चक्क हेल्मेटने फोडताना दिसतेय. मुलगा टीव्हीवर 'हेन्ताई' पाहत असल्यामुळे आईने ही प्रतिक्रिया दिल्याचं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

Viral Video
Viral Video: नवरदेव टकला निघाला, नाराज नवरीने भर मंडपात असं काही केलं की....

या व्हिडिओमध्ये मुलगा दिसत नाहीये. तसंच, हा व्हिडिओ नेमका कुणाच्या घरातला आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. ट्विटरवर या व्हिडिओला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. आईची प्रतिक्रिया अगदी बरोबर असल्याचं काही यूजर्सनी म्हटलं आहे. तर, आपल्या घरीही असं होऊ शकतो अशी भीती काही यूजर्सनी व्यक्त केली आहे.

काय आहे हेन्ताई?

सर्वसाधारपणे जपानी अ‍ॅनिमे किंवा कॉमिक (मांगा) स्वरुपात असणाऱ्या पॉर्नोग्राफिक कंटेंटला हेन्ताई म्हटलं जातं. केवळ जपानच नाही, तर जगभरात लाखो लोक अशा प्रकारचा कंटेंट पाहतात.

Viral Video
Viral Video: मुलीची छेडछाड अन् पोलिसावर दादागिरी; तरुणाची झाली भर रस्त्यात धुलाई!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.