Viral News : 'वर्किंग आवर्सनंतरही रिप्लाय द्या' कंपनीविरोधात तरूणी थेट कोर्टात, मिळाली एवढी भरपाई

ओव्हर टाइम वर्क कल्चरच्या बाबतीत बरेच देश आज आघाडीवर आहेत
Viral News
Viral Newsesakal
Updated on

Viral News : ओव्हरटाइम काम करणे सध्याच्या वर्क कल्चरमधे फार सामान्य झालेय. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या पर्सनल लाइफमधे स्ट्रेस निर्माण होतो. एका तरुणीने मात्र याविरोधात आवाज उठवला. तिने कंपनीविरोधात थेट कोर्टात तक्रार केली. या प्रकरणात तिला यशही मिळाले. तसेच तरुणीला नुकसान भरपाईसुद्धा मिळाली.

ओव्हर टाइम वर्क कल्चरच्या बाबतीत बरेच देश आज आघाडीवर आहेत. बऱ्याच लोकांनी आता याची दखल घ्यायला सुरुवात केलीय. तर काही लोक नोकरी जाण्याच्या भितीने शांतदेखील बसतात. मात्र एका तरुणीने याविरोधात बिनधास्तपणे तक्रार दाखल केलीय.

Viral News
Viral News

हे प्रकरण चीनमधील असून ही तरुणी आयटी (IT) कंपनीमधे कार्यरत होती. जेथे कंपनीतून बाहेर पडल्यानंतरसुद्धा तासंतास कंपनीच्या मेसेजेसचे रिप्लाय द्यावे लागे. यामुळे तिच्या वयक्तिक आयुष्यात फार तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलं.

तरुणीला भरपाई म्हणून मिळाली एवढी रक्कम

वियॉनच्या एका रिपोर्टनुसार, तरुणीच्या तक्रारीनंतर कोर्टात निर्णयाची सुनावणी झाली. कोर्टाच्या निर्णयात महिलेच्या झालेल्या मानसिक त्रासाच्या बदल्यात तिला नुकसान भरपाई म्हणून ३००० युआन (३.५५ लाख रुपये) मिळाले. महिलेने दावा केला होता की तिने एका वर्षात जवळतास २००० तास जास्त काम केले होते.

Viral News
Viral News : अमेरिकन मंत्र्यांचा साधेपणा! भारतात येताच अंस काही केलं की...सर्वत्र होतेय चर्चा

या अतिरिक्त वेळेत तिचा जास्तीत जास्त वेळ कंपनीच्या मेसेजेसचे रिप्लाय देण्यात गेलाय असं ती म्हणाली. कोर्टाचा निकाल महिलेच्या बाजूने लागला आणि महिला ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीस महिलेच्या अतिरिक्त कामाची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. तिच्या वर्किंग क्लासच्या महिलांसाठी ही फार मोठी अचिव्हमेंट होती. कारण चीनमधे कामगारांसंबंधित कायद्यांचे पालक फार कमी होताना दिसून येते.

Viral News
Viral News : धक्कादायक! भांडणानंतर मुलीने गिळला चक्क मोबाईल

चीनमधे कंटाळवाणं वर्क कल्चर

चीनमधे कर्मचाऱ्यांकडून आठवडाभर काम आणि २४ ऑनलाइन अॅक्टिव्ह राहाण्याची अपेक्षा केली जाते. तरुणीच्या बाजूने लागलेला निकाल आता या कंपन्यांसाठी एक मोठी शिकवण सिद्ध होणार आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर आता व्हॉट्सअॅप आणि व्हिचॅट सारख्या मेसेजिंग अॅपच्या लीगल स्टेटसबाबत प्रश्न उपस्थित झालेय. कामानंतरही मेसेजेसवर अॅक्टिव्ह राहाणे ओव्हर टाईम नियमांत मोडले जाईल का असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधे निर्माण झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.