Viral Video : ये जो सुरुर है अभी भी शशी थरुर का गुरुर है! वय वर्ष ६७ पण अजूनही…

Women flock to take selfies with 67-year-old MP Shashi Tharoor video goes viral
Women flock to take selfies with 67-year-old MP Shashi Tharoor video goes viral
Updated on

Shahsi Tharoor Viral Video : काँग्रेस खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची पुन्हा एकदा क्रेझ पाहायला मिळाली. थरुर यांच्यासोबतचे फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी महिलांनी तुफान गर्दी झाल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पाहायला मिळाला.

खासदार थरूर हे इंदूरला एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका कार्यक्रमात त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांमध्ये थरूर यांची क्रेझ दिसून आली. महिलांनी त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी केलेल्या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक बॉलिवूड चित्रपटाचे गाणे एडिट करून हा व्हिडिओ चालवत आहेत. महिलांची झुंबड उडलेली या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Women flock to take selfies with 67-year-old MP Shashi Tharoor video goes viral
लेक आमदार तरी ८० वर्षीय मातेचा संघर्ष सुरूच…; आजही विकतायत बांबूच्या टोपल्या

इंदूर येथे 'शशिम्स' कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात थरूर ऐकण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी थरूर यांनीही कोणालाही निराश केले नाही आणि त्यांच्या आयुष्याबद्दल तसेच इतरही अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.

Women flock to take selfies with 67-year-old MP Shashi Tharoor video goes viral
Dream 11 Team : अवघ्या ४९ रुपयांत टीम बनवली,जिंकले दीड कोटी! ट्रक ड्रायव्हरचं 'ड्रीम' झालं पूर्ण

थरूर यांना बायकांचा गराडा…

कार्यक्रम आटोपल्यानंतर महिलांनी थरूर यांना घेराव घातला आणि त्यानंतर सेल्फी घेण्याची चढाओढ पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांची अक्षरशः रांग लागली होती. आयोजकांच्या विनंतीनंतरही महिला थांबल्या नाहीत. घटनास्थळापासून ते कारमध्ये बसेपर्यंत महिला त्याच्यासोबत सेल्फी काढत राहिल्या. यावेळी काँग्रेस खासदार थरूर यांच्या चेहऱ्यावर कसलीही नाराजी दिसत नव्हती. त्यांनी अगदी आनंदाने सर्वांसोबत सेल्फी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.