Video : हंडाभर पाण्यासाठी वाळवंटातील महिलांची रणरणत्या उन्हात वणवण; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Water Crisis
Water CrisisSakal
Updated on

उन्हाळ्यात दुष्काळी भागामध्ये मोठी पाणी टंचाई होते. आपल्यापैकी अनेकांनी दुष्काळाच्या झळा अनुभवल्या असतील. पण वाळवांटामध्ये नागरिकांना पाण्यासाठी कशी कसरत करावी लागते माहितीये का? सध्या वाळवंटातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ते एका कूपनलिकेमधून पाणी बाहेर काढताना दिसत आहेत.

Water Crisis
Viral Video : शेतकऱ्याचा नाद! पोरगं टपावर नांगर शेतावर; थेट नांगराला जुंपली 'थार'

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आफ्रिकेतील असल्याचं सांगण्यात येत आहे. आफ्रिकेतील वाळवंटामध्ये पाण्याची खूप टंचाई असून तेथील नागरिकांना अशा पद्धतीने पाणी काढावे लागते. यामध्ये दोन तरूणी एक भांडे कूपनलिकेमध्ये सोडतात आणि त्याला एका दोरीच्या साहाय्याने वर काढतात. यामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच लीटर पाणी वर येते.

दरम्यान, हे पाणी घरापर्यंत नेण्यासाठी गाढवाचा वापर केला जातो. गाढवाच्या पाठीवर पाण्याचे ड्रम ठेवून ते घरापर्यंत नेले जातात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जगाच्या एका ठिकाणी पाण्यासाठी अशी परिस्थिती असेल तर आपण पाणी कसं वापरयाला पाहिजे यावर नेटकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.