उजैन : मध्य प्रदेशातील उजैन इथल्या प्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात एका भक्तानं जगातील सर्वात महागडा आंबा प्रसाद म्हणून अर्पण केला आहे. या आंब्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात चक्क २ लाख ७० रुपये किलो इतकी आहे. यामुळं आता फळांच्या या राजाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. पण हा आंबा नेमका कुठल्या जातीचा आहे आणि कुठे उपलब्ध आहे जाणून घेऊयात. (world most expensive mango offered as prasad in ujjain mahakal temple)
जबलपूर येथील रहिवासी असलेल्या संकल्प सिंह परिहार हे बाबा महाकालचे निस्सिम भक्त आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांनी आपली आर्थिक परिस्थिती बिकट असताना महाकालचे आशीर्वाद घेऊन एक आमराई उभारली होती. या आमराईला त्यानं 'महाकाल हायब्रिड फार्म' असं नाव ठेवलं, सुमारे १० एकरात ही आमराई पसरली आहे. या आमराईत आंब्याची अनेक कलमं आहेत. आत्ता या आमराईत सुमारे १५०० झाडं आहेत. तसेच १६ ते १७ प्रकारचे आंबे आहेत. जबलपूरच्या भेडाघाट परिसरात ही आमराई आहे.
याच आमराईत जगातील सर्वाधिक महागडा आंबा 'मियाजाकी' पिकवला जात आहे. या आंब्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये प्रतिकिलो आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन आंब्याचं वाण R2V2 तसंच जपानचा प्रसिद्ध आंबा टोमेगो या फळाची झाडंही या आमराईत आहेत. परिहार हे महाकालचे भक्त असल्यानं या आमराईतील पहिलं फळ ते देवाला अर्पण करतात. यंदा सलग तिसऱ्यांदा उज्जैनला जाऊन त्यांनी बाबा महाकालला हे अत्यंत महागडं फळ अर्पित केलं आहे.
महाकाल हायब्रिड फार्मची राखण करण्यासाठी सुरक्षा रक्षकांसोबत डझनभर कुत्री देखील तैनात करण्यात आली आहेत. दिवसभर या कुत्र्यांना पिंजऱ्यात ठेवलं जातं पण रात्री त्यांना आमराईच्या रक्षणासाठी खुलं सोडलं जातं.
आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये किंमत असलेला मियाजाकी आंब्याचं वजन सुमारे ७०० ते ८०० ग्रॅम इतकं असतं. त्यामुळं जर या आंब्याचा किलोचा भाव आणि एका आंब्याचं वजन लक्षात घेतलं तर एक नग आंब्याचीच किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी आहे. जर या एक डझन आंब्यांची किंमत पाहिली तर ३०,००,००० लाख रुपये इतकी होते.
या हायब्रिड आंब्याच्या झाडाची उंची जास्तीत जास्त १० फूट असते. या आंब्यांना केमिकलमध्ये नव्हे तर सुकलेल्या गवतात नैसर्गिक पद्धतीनं पिकवले जातात. या आंब्याचा सिझन हा इतर आंब्यांच्या तुलतनेत उशीरानं सुरु होतो. त्यामुळं हे आंबे जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात दाखल होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.