कर्नाटक : पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे हे भारतात सगळीकडेच पहायला मिळतात. आपल्याकडील रस्ते बनवण्याच्या तंत्रामधलाच हा दोष असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. असं असलं तरी नागरिकांना मात्र पावसाळा आली की रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमधून वाहनं चालवणं हा एक प्रकारचा मनस्ताप ठरलेलाच असतो. याच खड्ड्यांविरोधात आजवर विविध प्रकारची अनोखी आंदोलनं आपण पाहिली असतील, असंच एक आंदोलन कर्नाटकातील रस्त्यांवर पहायाल मिळालं आहे.