Video Viral : महिलांचा वेश परिधान करून महिलांच्या सीटवर बसला तरूण; गुंगीचे औषध देऊन अपहरण करत असल्याचा आरोप

महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे अपहरण करण्यात येत असल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
Video Viral
Video ViralSakal
Updated on

सोशल मीडियावर सध्या एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण महिलांचा वेश परिधान करून बसमध्ये महिलांच्या सीटवर बसल्याचं दिसत आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर काही व्यक्तींनी त्याला त्याचा वेश उतरवण्यास सांगितलं आहे. तोंडावरील मास्क काढल्यानंतर हा तरूण असल्याचं समोर आलं.

या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यासंदर्भाती अधिकृत माहिती समोर आली नाही. पण या तरूणांकडून महिलांना गुंगीचे औषध खायला देण्यात येते आणि त्यानंतर त्यांना रूग्णवाहिकेत बसवून गायब केले जाते असा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सकाळ माध्यम या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

"महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस्था केलेल्या रुग्णवाहिकेला कॉल करतात आणि रुग्णालयात नेण्याचे नाटक करून मुलींना गायब करतात. ही संघटित योजना आहे. हजारो मुली - महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे आहेत. महिला व मातांनी सावध राहावे." असं कॅप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Video Viral
बॅगेत लपवून आणले 15 कोटींचे कोकेन; युगांडातील महिला अन् भारतीय प्रवाशाला मुंबईत अटक | DRIची कारवाई

"सावधानता बाळगाच. आपल्या देशातील तसेच अधिक प्रमाणात महाराष्ट्रातून प्रेमाच्या लोभात, भावनिक फसवणूक करवून, कामाच्या निमित्ताने, अधिक पैसा कमवून जीवन सुखकर होण्याच्या प्रलोभनाने सुशिक्षित महिला, युवती, मोठ्या पदावरील तरुणी जाळयात अडकवून, अवैध कागदपत्रे बनवून परदेशात विशिष्ठ भागात डांबुन ठेवल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत."

"आता काही दिवसांपूर्वी त्यांच्या तावडीतून सुटून व काही महिला व युवतींना सोडवून आणणाऱ्या, प्रखर राष्ट्रभक्ती बाळगणाऱ्या भागिनी ची भेट घेऊन कटू सत्य जाणून घेतले. कायदेशीर मार्गाने देशाचा गृहविभाग उर्वरित महिला व युवतिना भारतात परत आणण्यासाठी कटिबद्ध आहे. विनंती एवढीच सर्वसमावेशक व सर्वांगीण सुरक्षा हेतू या माध्यमातून सर्वांना सूचित करणे आवश्यक आहे." असंही सदर व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com