YouTuber Truck Driver : ट्रक ड्रायव्हरने रेसिपीचे व्हिडिओ पोस्ट करत उभारलेले दोन कोटीचे घर पाहिले का?

अलीकडेच त्यांनी यूट्यूबच्या कमाईने दोन कोटीं रूपयांचे नवीन घर देखील विकत घेतले आहे.
YouTuber Truck Driver
YouTuber Truck Driveresakal
Updated on

YouTuber Truck Driver :

आजकाल आपलं आहे ते काम सांभाळत पैसे कमवण्याचा अन् प्रसिद्ध होण्याचा मार्ग म्हणजे युट्युब चॅनेल होय.Youtube ने अनेक लोकांना प्रसिद्धी दिली, अनेक लोकांची घरे बांधली. काही मराठी सोशल मिडिया स्टार्सचे तर जीवनच युट्यूबने बदलले आहे. Youtube ने एका ट्रक ड्रायव्हरचे जीवनही बदलले आहे.   

झारखंडमधील जामतारा येथील ट्रक ड्रायव्हर राजेश रवाणी यांनी जवळपास २५ वर्षे भारतातील रस्त्यांवर ट्रक चालवण्यात घालवली आहेत. कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ट्रक चालवण्यास सुरुवात केली, परंतु त्याची खरी ही आवड स्वयंपाक बनवण्याची आहे. याच छंदाने त्याला यूट्यूबचा हिरो बनवला आहे.

YouTuber Truck Driver
IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

ट्रक ड्रायव्हर कुटुंबापासून दूर असतात. सतत धोक्याच्या रस्त्यांवरून प्रवास करतात. रात्री-अपरात्री जंगली पशु, चोर यांचा सामना त्यांना करावा लागतो. अशावेळी, त्यांना रस्त्याच्या कडेलाच जेवण बनवावे लागते, तसेच झोपावे लागते. राजेश रवाणी यांनी देखील याच परिस्थितीत युट्युब चॅनेल सुरू केले.

सध्या राजेश रवाणीचे YouTube वर 1.86 दशलक्षांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत, अलीकडेच त्यांनी यूट्यूबच्या कमाईने दोन कोटीं रूपयांचे नवीन घर देखील विकत घेतले आहे. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांचेही लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्याने सोशल मीडिया हँडल X वर त्याच्या 'मंडे मोटिव्हेशन' मालिकेतील राजेशचा व्हिडिओ पोस्ट केला.

YouTuber Truck Driver
IND vs BAN 1st Test : बॅटीची पूजा अन्...! Rishabh Pant फलंदाजीला येण्यापूर्वी बघा काय करतो; IPL टीमसह चाहतेही फिदा Video Viral

राजीवचे दोन कोटींचे घर

युट्युब वर व्हिडिओ करत राजीव यांनी लाखो रुपयांची कमाई केली. ही गोष्ट तर अनेकांना माहिती आहे. पण त्यांनी या पैशातून वायफळ खर्च न करता स्वतःसाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी एक घर खरेदी केले. ते घर दोन कोटी रुपयांचे असून याबद्दल ते म्हणतात की. मला कधी वाटलं नव्हतं की मी इतक्या मोठ्या घरात राहायला येईल.

कारण पूर्वी आम्ही जिथे राहायचो तिथे अनेक लोक एकाच रूममध्ये राहत होतो. आणि माझे दुसरे घर माझा ट्रक ही आहे. तरीही एक हक्काचं घर असावं असं वाटत होतं. माझे घर जेव्हा मी यायला आलो तेव्हा मला वाटलं नव्हतं की हे माझं घर असेल. पण हळूहळू हे सगळं स्वप्न सत्यात उतरलं ते माझ्या कष्टामुळे आणि मुलांच्या आणि कुटुंबाच्या सोबतीमुळे, असेही ते म्हणाले.

ट्रक चालवून ते दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमावतात, तर युट्युबवर दरमहा चार लाख ते पाच लाख रुपये कमावल्याचे त्याने सांगितले. तर त्याची कमाल कमाई 10 लाख रुपये आहे. त्याने त्याच्या ब्लॉगमधून एका महिन्यात 18 लाख रुपये कमावले आहेत.

गंभीर अपघातातून बचावले

मी प्रवासात असताना सतत दक्ष रहावं लागतं, प्रवासात डोळा लागून चालत नाही. नाहीतर जीव गेलाच म्हणून समजा, याचा प्रत्ययही राजेश यांना आला. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजेशने त्याच्या YouTube प्रवासाबद्दल तपशीलवार चर्चा केली. यामध्ये त्याने आपल्यासोबत घडलेल्या एका भीषण अपघाताचा उल्लेख केला आहे.

ज्यात त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. हाताला झालेली दुखापत आणि त्यामुळे होणारी आर्थिक समस्या असतानाही मी ट्रक चालवत राहिल्याचे त्यांनी सांगितले.अपघातानंतर माझ्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते, पण घर पूर्ण होईपर्यंत गाडी चालवण्याचा माझा मानस होता, जो मी दरमहा लाखोंची कमाई करत राहिलो.

YouTuber Truck Driver
Virat-Gambhir Viral Interview : विराट कोहलीचा 'ॐ नमः शिवाय' चा जप अन् गौतम गंभीरची 'हनुमान चालिसा'; नेमकं काय प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.