Zomato Delivery Boy Food from Plastic Packet : सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ हे खूप काही सांगून जाणारे असतात. त्यातून खूप काही शिकण्यासारखेही असते. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रश्नात पाडले आहे. झोमॅटोवाल्या डिलिव्हरी बॉयनं जे केले ते चूकीचं केलं की बरोबर तुम्हीच सांगा...असा प्रश्न तो व्हिडिओ पाहिल्यानंतर पडला आहे.
सध्या बाजापेठेत खूप सारे फुड डिलिव्हरी अॅप्स आले आहेत. त्यातून तुम्ही घरबसल्या हवं ते ऑर्डर करु शकता. सोशल मीडियावर या फुड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम कऱणाऱ्यांच्या भन्नाट बातम्या, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातून कधी गमतीशीर बाबी समोर येतात तर कधी गंभीर गोष्टीही घडत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ट्विटरवरील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडिओमध्ये एक फु़ड डिलिव्हरी करणारा मुलगा दिसतो आहे. मात्र तोच कमालीचा भुकेला आहे. अशावेळी त्याला जी ऑर्डर आली आहे ती द्यायला जायच्या ऐवजी तो जेवण करताना दिसत आहे. त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतील अन्न तो पटापट खातो आहे. ती पिशवी पुन्हा बंद करुन त्या बॅगमध्ये ठेवतो आहे. असा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शेकडो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
सनदी अधिकारी अविनाश सरन यांनी तो व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्या डिलिव्हरी बॉयला असे वाटते की आपल्याला कुणी पाहत नाही पण एका कॅमेऱ्यामध्ये तो कैद झाला आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांना त्या मुलाला काय म्हणावं, त्यावर काय लिहावं असा प्रश्न पडला आहे. काहींनी तर भूक ही इतकी वाईट गोष्ट आहे की, तुम्हाला अनेकदा आपण काय करतो आहोत याचा विसर पडल्या वाचून राहत नाही. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून त्याला आतापर्यत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आले आहेत. नेटकऱ्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. कित्येकांनी त्या झोमॅटोवाल्याच्या त्या कृतीचे समर्थन केले आहे. तर काहींनी हे चुकीचे असून तुम्ही ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.