Budget 2024: कोणत्या मंत्र्याला मिळाले सर्वात जास्त पैसे? अमित शाह, राजनाथ सिंह की नितीन गडकरी? वाचा खातेनिहाय निधीची तरतूद

Union budget updates: निधीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण मंत्रालय आहे. हे खातं राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. संरक्षण मंत्रालयासाठी ४ लाख ५४ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाला १ लाख ५० हजार ९८३ कोटी रुपये मिळाले आहेत.
Budget 2024
Budget 2024esakal
Updated on

Nirmala Sitharaman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांसाठी तरतूद केल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. नेहमीप्रमाणे यावेळीही मंत्रालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

सर्वात जास्त निधी गडकरींना

२०२४-२५च्या अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सर्वात जास्त निधी मिळालेला आहे. हे मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे आहे. बजेटमध्ये गडकरींच्या परिवहन मंत्रालयासाठी ५ लाख ४४ हजार १२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Budget 2024
Union Budget 2024 Capital Gains Tax: लाँग टर्म कॅपिटल म्हणजे काय? अर्थसंकल्पात कोणते बदल झाले ज्यामुळे शेअर बाजार कोसळला?

संरक्षण मंत्रालयाला ४ लाख ५४ हजार ७७३ कोटी रुपये

निधीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण मंत्रालय आहे. हे खातं राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. संरक्षण मंत्रालयासाठी ४ लाख ५४ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाला १ लाख ५० हजार ९८३ कोटी रुपये मिळाले आहेत.

कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५१ हजार ८५१ कोटी रुपयांची तरतूद

शिवराज सिंह चौहान यांच्या कृषी मंत्रालयाला बजेटमध्ये १ लाख ५१ हजार ८५१ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय आरोग्य मंत्रालयासाठी ८९ हजार २८२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. हे मंत्रालय जेपी नड्डा यांच्याकडे आहे.

तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण खात्यासाठी १ लाख २५ हजार ६३८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. परराष्ट्र मंत्रालयासाठी २२ हजार १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. शहरी विकासासाठी बजेटमध्ये ८२ हजार ५७७ कोटी रुपये संकल्पित करण्यात आलेले आहेत.

Budget 2024
Cancer Treatment Cost : कर्करोगाचे उपचार महाग का? कर्करोगावरील औषधांवर एकूण किती खर्च येतो? घ्या जाणून

याशिवाय ऊर्जा मंत्रालयाला ६८ हजार ७६९ कोटी रुपये, आयटी आणि दूरसंचार मंत्रालयासाठी १ लाख १६ हजार ३४२ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. ग्रामीण विकासासाठी २ लाख ६५ हजार ८०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांसह, ग्रामविकासासाठी २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त निधीची तरतूद रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण मंत्रालय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.