Lotus Chakravyuh: भारत लोटस चक्रव्यूहात अडकलाय, ही सहा जणं सूत्रधार; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण

Rahul Gandhi speech in Loksabha : विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरुन आज केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावर टीका केली.
Narendra Modi and Rahul Gandhi Lotus Chakravyuh
Narendra Modi and Rahul Gandhi Lotus Chakravyuhsakal
Updated on

नवी दिल्ली : विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरुन आज केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना पक्षाचा उल्लेख 'लोटस चक्रव्यूह' असा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधुनिक चक्रव्युहात सध्या देश अडकला आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, २१ व्या शतकात एक नवं चक्रव्युह तयार झालं आहे आणि चक्रव्युहाचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून फिरत असतात. या चक्रव्युहामागे तीन शक्ती आहेत. पहिली म्हणजे एकाधिकारशाही, ज्याअंतर्गत केवळ दोनच लोकांना भारतात सर्वकाही करण्याची परवानगी आहे. यातील एक भाग हा आर्थिक शक्ती आणि दुसरा भाग सरकारी तपास यंत्रणा आहेत. तर तिसरा भाग हा राजकीय शक्ती आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार असलेल्या टॅक्स टेररिझमवर भाष्य करण्यात आलेलं नाही. मला वाटलं होतं की, हा अर्थसंकल्प चक्रव्युहाची शक्ती कमी करेल. पण या अर्थसंकल्पाचा आत्मा हा मोठ्या उद्योगांना अधिक सक्षम करण्याचा आहे. व्यावसायांची एकाधिकारशाही, राजकीय एकाधिकारशी जे लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पानं सुक्ष्म व लघु उद्योगांवर हल्ला केला आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि टॅक्स टेररिझम.

हा एकप्रकारे चक्रव्युह आहे भीतीचं चक्रव्युह ज्यानं कमळाचा आकार घेतला आहे. तरुण इथं अग्निवीर नावाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. कारण या अर्थसंकल्पात अग्निवीर आणि पेन्शनसाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. यावेळी त्यांनी नीट पेपर लीकचा मुद्दा देखील उपस्थित केला.

Narendra Modi and Rahul Gandhi Lotus Chakravyuh
UPSC Coaching Centre Deaths : तीन विद्यार्थी दगावले त्या कोचिंग सेंटरची फी माहितेय? जाणून घ्या ७० वर्षांहून जुन्या संस्थेचा इतिहास

पेपर लीकवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केलं नाही. तरुणांना वाटयंत की नीट पेपर लीकचा मुद्दा खुपच महत्वाचा आहे, पण याचा अर्थसंकल्पावेळी एकदाही उल्लेख केला गेला नाही. शिक्षणासाठीचा अर्थसंकल्पातील वाटा हा आता २० वर्षातील सर्वाधिक कमी झाला आहे. जो जीडीपीच्या केवळ २.५ टक्के इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.