Union Budget : आई देशाचा अर्थसंकल्प सादर करत होती अन् मुलगी गॅलरीत बसून तिला एकटक..

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला.
Union Budget Nirmala Sitharaman
Union Budget Nirmala Sitharamanesakal
Updated on
Summary

नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government) सध्याच्या कारकिर्दीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळं लोकसभेची गॅलरी लोकांनी खचाखच भरलेली होती.

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला.

आज जेव्हा सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत होत्या, तेव्हा लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेली त्यांची मुलगी आणि नातेवाईक त्यांच्याकडं बारकाईनं पाहत होते.

नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government) सध्याच्या कारकिर्दीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळं लोकसभेची गॅलरी लोकांनी खचाखच भरलेली होती. या लोकांमध्येच निर्मला सीतारामन यांची मुलगी वांग्मयी परकला (Vangmayi Parakala) आणि तिचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.

Union Budget Nirmala Sitharaman
Union Budget : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकार 'या' राज्यावर मेहरबान; अर्थसंकल्पात 'इतक्या' कोटींची तरतूद

सीतारामन यांनी अर्थसंकल्पासाठी अनेक प्रस्ताव जाहीर केल्यामुळं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि सभागृहाच्या विशेष गॅलरीत बसलेले राज्यसभेचे अनेक सदस्य नोट्स घेताना दिसले. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, सध्या जगानं भारताला एक चमकता तारा म्हणून ओळखलंय. चालू आर्थिक वर्षात भारताचा सात टक्के विकास दर हा प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जगानं भारताला एक चमकता तारा म्हणून संबोधलंय. जगानं देशाच्या कामगिरीचं कौतुकही केलंय, असं त्यांनी सांगितलं.

Union Budget Nirmala Sitharaman
India Defence Budget : भारताच्या तुलनेत चीन-पाकिस्तानचं संरक्षण बजेट किती? पाहा आकडेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.