Budget 2022 : 1950 मध्ये चार पैसे आयकरावर चालत होते सरकार

अर्थसंकल्पात सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबवर.
Income Tax
Income Taxgoogle
Updated on

Budget 2022 : अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करण्यापूर्वी आणि अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान, सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे 'इन्कम टॅक्स स्लॅब' हा (Income Tax Slab) आहे. आयकर स्लॅब हा अर्थसंकल्पाचा असा विषय राहिला आहे, ज्यावर प्रत्येक सामान्य नागरिकांच्या नजरा खिळलेल्या असतात. दरम्यान, यावेळी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी, नोकरदार वर्गाला आयकर स्लॅबमध्ये बदलाची अपेक्षा आहे. आज आम्ही 1950 मध्ये इन्कम टॅक्स किती होता आणि त्यासंबंधीच्या काही रंजक गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत. (Budget 2022)

Income Tax
Union Budget: रेल्वेअर्थसंकल्प कधी अन् का बंद झाला ? वाचा रंजक माहिती

स्वातंत्र्यापूर्वीही होता कर

गेल्या आठ वर्षांपासून न बदललेल्या आयकर स्लॅबबाबत अर्थमंत्री नक्कीच विचार करतील, अशी आशा करदात्यांना आहे. (What Is the Tax Slab In Old Budget) टॅक्सबाबत कोणताही निश्चित नियम नाही. शासनाकडून वेळोवेळी यामध्ये बदल करण्यात येतो. पण गंमत अशी आहे की, स्वातंत्र्यापासून प्रत्येक सरकार कर घेत आहे. असे म्हणतात की, स्वातंत्र्याच्या 82 वर्षांपूर्वी उत्पन्नावर कर प्रणाली लागू करण्यात आली होती.

Income Tax
Budget 2022 : 'या’ अर्थमंत्र्यांनी मांडला नव्हता एकही अर्थसंकल्प! वाचा असं का?

1949-50 च्या अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आले दर

स्वातंत्र्यानंतर, भारतात प्रथमच 1949-50 च्या अर्थसंकल्पात (Intersting Facts About Old Indian Budget) आयकराचे दर निश्चित करण्यात आले. यापूर्वी 10 हजारांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 4 पैसे कर भरावा लागत होता. नंतर ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 3 पैशांनी कमी करण्यात आले. त्याच वेळी, 10 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 1.9 आणे कर भरावा लागत होता.

Income Tax
Budget 2022: बजेटपूर्वी 'हे' 10 स्टॉक्स घ्या, तगडी कमाई करा; तज्ज्ञांचा सल्ला

1,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते

1949-50 च्या अर्थसंकल्पात आयकराचे दर निश्चित केल्यानंतर 1,500 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नव्हता. या अर्थसंकल्पात 1,501 ते 5,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 4.69 टक्के आयकराची तरतूद होती. त्याच वेळी, 5,001 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10.94 टक्के कर भरावा लागत होता. (Current Income Tax Slab)

Income Tax
Budget 2022: मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून हव्यात या पाच गोष्टी!

सर्वाधिक 31.25 टक्के कर

याशिवाय, 10,001 ते 15,000 रुपये कमाई करणाऱ्यांना 21.88 टक्के दराने आयकर भरावा लागत होता. 15,001 रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांसाठी आयकर स्लॅब 31.25 टक्के होता. त्यानंतर वर्षानुवर्षे कर नियम बदलले गेले. आता करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वर्तमान आयकर दर

  • 2.5 लाख रुपये आयकर मुक्त

  • 2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5%

  • 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10%

  • 7.5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के

  • 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर

  • रु. 12.5 लाख ते रु. 15 लाख दरम्यानच्या उत्पन्नावर 25%

  • 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.