काय स्वस्त, काय महाग? बजेटचा तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

Budget 2022 : कोणत्या वस्तूसाठी खिशाला कात्री लागणार अन् काय परवडणार?
Cheaper and Costlier in Union Budget 2022
Cheaper and Costlier in Union Budget 2022Sakal
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला. देशाच्या अर्थसंकल्पातील (Budget 2022) तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो. कोरोनातून सावरत असताना आगामी वर्षासाठी सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणानंतर (Union Budget) कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महागणार असा प्रश्न सामान्य लोकांमध्ये असतो. जाणून घेऊयात कोणत्या वस्तूमुळे खिशाला अधिक कात्री लागणार आणि कोणत्या गोष्टी घेणं परवडणार....

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र करदात्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. सलग सहाव्या वर्षी करात सवलत देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे करदात्यांची (Income Tax) निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला देशात डिजिटल चलन (Digital Currency) आणण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

काय स्वस्त होणार?

  • कपडे, चामड्याचा वस्तू

  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

  • मोबाईल फोन, चार्जर

  • हिऱ्याच्या वस्तू, दागिने

  • शेतीची अवजारे

  • कॅमेरा लेन्सेस

  • इंधन स्वस्त होण्याचे संकेत

  • इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार

Cheaper and Costlier in Union Budget 2022
Union Budget 2022 : आता दोन वर्षात 'इन्कम टॅक्स रिटर्न' करता येणार अपडेट

काय महागणार?

  • क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग

  • छत्र्या महाग होणार

  • आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()