Budget 2021: विकासाचा विश्‍वास देणारा अर्थसंकल्प

Narendra-modi
Narendra-modi
Updated on

सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा न वाढविणारा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. यात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वास्तवाची जाणीव व विकासाचा विश्‍वास हे दोन्हीही आहे. या अर्थसंकल्पाच्या हृदयात आमचा शेतकरी बांधव व ‘गाव’ (ग्रामीण भारत) वसले आहे. एका अभूतपूर्व परिस्थितीत मांडला गेलेला हा अर्थसंकल्प पारदर्शक असून तो आत्मनिर्भरतेच्या मार्गावरून जाणारा, आगामी दशकाला मजबूत आधार देणारा व रोजगार वाढविणारा आहे. यात सामान्य नागरिक तसेच महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य, स्वच्छता, पोषण, शुद्ध पाणी व समान संधी मिळाव्यात यावर विशेष जोर दिला आहे. देशाच्या आत्मविश्‍वासाचे दर्शन घडविणारा हा अर्थसंकल्प आहे. विशेतः देशाच्या कृषी क्षेत्राच्या मजबुतीसाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यावर जोर दिला आहे. देशातील बाजार समित्या बळकट करण्याचीही तरतूद यात आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी (एमएसएमई) मागच्या वर्षीच्या दुप्पट तरतूद आहे. कोरोनाच्या साथीमुळे सामान्य लोकांवरील कराचा बोजा वाढेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सरकारच्या सामान्यांप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेतून सराकरने तो मार्ग टाळला. संपत्तीचे सृजन व जनकल्याण या दोन्हींशी अर्थसंकल्प संबंधित आहे. यामुळे व्यक्तिगत आयुष्यांबरोबरच उद्योग, गुंतवणूकदार व पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रांतही मोठे सकारात्मक बदल होतील. 

विकासाच्या नव्या संधींचा शोध घेणारा, युवकांसाठी नव्या संधींची दारे उघडणारा, पायाभूत संरचनेला उच्च स्तरावर नेणारा, उद्योग क्षेत्राची व गुंतवणुकीची चक्रे पुन्हा गतिमान करणारा व नव्या सुधारणांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.