Budget 2024: अर्थसंकल्पात शहरी विकासावर फोकस; देशातल्या शंभर मोठ्या शहरांसाठी 'या' घोषणा

Union budget session 2024 for Urban Development: अर्थसंकल्पामध्ये शहरी विकासावर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, ३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शंभर मोठ्या शहरांमध्ये मुलभूत सुविधांसाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. शहरी विकासाच्या योजनांचा लाभ १ कोटी मध्यमवर्गीय कुटुंबियांना होणार आहे. यासह निवडक शहरांमध्ये स्ट्रीट फूड हब उभे केले जाणार आहेत.
Budget 2024
Budget 2024esakal
Updated on

Urban Development Union Budget 2024-25: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. शहरी विकासासाठी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासावर मोदी सरकारने भर दिला असून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बत ११ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जीडीपीच्या ३.४ टक्के खर्च पायाभूत सुविधांवर होणार आहे.

अर्थसंकल्पामध्ये शहरी विकासावर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, ३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शंभर मोठ्या शहरांमध्ये मुलभूत सुविधांसाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. शहरी विकासाच्या योजनांचा लाभ १ कोटी मध्यमवर्गीय कुटुंबियांना होणार आहे. यासह निवडक शहरांमध्ये स्ट्रीट फूड हब उभे केले जाणार आहेत.

Budget 2024
Union Budget 2024: नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल; मुलींच्या योजनांसाठी निर्मला सीतारामण यांनी जाहीर केले 3 लाख कोटी

पायाभूत सुविधा

अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांवर बोलताना सांगितलं की, रोड कनेक्टिव्हिटचे आम्ही समर्थन करतो. या अनुषंगाने आम्ही पाटना ते पुर्णिया एक्स्प्रेस-वे, बोधगया-राजगीर-वैशाली-दरबंगा एक्स्प्रेस-वे, बक्सर-बागलपूर एक्स्पेस-वे बांधणार आहोत. अतिरिक्त दोन लेन पूल बक्सर येथे गंगा नदीवर बनवला जाणार आहे. यासाठी २६ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याशिवाय २५ हजार गावे पक्क्या रस्त्याने जोडले जाणार आहेत.

 कृषी, रोजगार, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, नवीन उपक्रम, संशोधन आणि विकास, तरुणांसाठी सुविधा; या मुद्द्यांना धरुन अर्थसंकल्प सादर केला. कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची घोषणा करण्यात आलेली असून सरकार राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. त्याच वेळी, सरकार भाज्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार आहे.

अर्थसंकल्पाचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Budget 2024
Budget 2024 Women: महिलांसाठी नेमक्या कोणत्या आठ मुद्द्यांचा उल्लेख? अर्थमंत्र्यांनी केल्या या महत्वाच्या घोषणा

अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली. बिहारच्या गयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.