Union Budget: रेल्वेअर्थसंकल्प कधी अन् का बंद झाला ? वाचा रंजक माहिती

रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास रंजक असून, आजही काही रेल्वे मंत्र्यांची भाषणं चर्चेचा विषय ठरतात.
Why Railway Budget merged?
Why Railway Budget merged?Sakal
Updated on

येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोनाची स्थिती (Covid Pandemic) आणि अर्थचक्रावर झालेला परिणाम यामुळे यंदाच्या अर्थसंकल्प नेमका कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. दरम्यान, काही वर्षांपर्यंत देशात वेगळा रेल्वे अर्थसंकल्प (History Of Indian Railway Budget) सादर करण्याची परंपरा होती. मात्र, नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार सत्तेत आल्यानंतर वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा बंद करण्यात आली. रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास खूप रंजक आहे. तर काही रेल्वे मंत्र्यांची भाषणं आजही चर्चेचा विषय ठरतात. (Interesting Facts About Indian Railway Budget )

Why Railway Budget merged?
Budget 2022 : 'या’ अर्थमंत्र्यांनी मांडला नव्हता एकही अर्थसंकल्प! वाचा असं का?

रेल्वेचे शेवटचे अंदाजपत्रक प्रभुंनी केले सादर

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 21 सप्टेंबर 2016 रोजी रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे वेगळा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्याची 92 वर्षांची प्रथा खंडीत झाली. तत्पूर्वी सुरेश प्रभू (Suresh Prabhu Presented Last Indian Budget) यांनी शेवटचे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले, त्याचवेळी त्यांनी देशाच्या व्यापक हितासाठी विलीनीकरण केल्याचे सांगितले होते. (When Was The Last India Railway Budget Presented )

Why Railway Budget merged?
भारताचे अर्थमंत्री अन् थेट पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण होती ती व्यक्ती?

92 वर्षे सादर करण्यात आला रेल्वे अर्थसंकल्प

देशात जवळपास 92 वर्षे रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होता. पण, अखेर तो वेगळा सादर करणे बंद करण्यात आले, आणि देशाच्या अर्थसंकल्पातच त्याचा समावेश करण्यात आला. (Why Indian Railway Budget Not Presented Separately ) ब्रिटिशांच्या काळात, 1924 मध्ये ब्रिटिश अर्थतज्ञ विल्यम ऍकवर्थ (British economist William Ackworth) यांची समिती रेल्वेच्या कामकाजाबाबत 1920-21 मध्ये नेमण्यात आली. ऍकवर्थ समितीने रेल्वेच्या कारभाराच्या आणि प्रशासकीय जबाबदारीच्या फेररचनेसह स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर करण्याची शिफारस केली. त्यानंतर 1924 मध्ये पहिले स्वतंत्र रेल्वे अंदाजपत्रक सादर केला गेला होता.

Why Railway Budget merged?
स्वातंत्र्यानंतर सर्वात चर्चेत राहिलेला अर्थसंकल्प; संबोधले होते 'ड्रीम बजेट', वाचा का?

जॉन मथाई यांनी सादर केला रेल्वेचे पहिले अंदाजपत्रक

स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे अंदाजपत्रक जॉन मथाई (John Mathai) यांनी नोव्हेंबर 1947 मध्ये सादर केले. तर सुरेश प्रभू यांनी रेल्वेचे शेवटचे अंदाजपत्रक सादर केले होते. देशाच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, 2016 मध्ये रेल्वे अंदाजपत्रक अर्थसंकल्पात समाविष्ट करून, एकत्रित अर्थसंकल्प सादर केला गेला होता. (When Was The First Indian Rail Budget Presented)

ममता ठरल्या पहिल्या महिला रेल्वेमंत्री

2004 ते मे 2009 या कालावधीत लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी सलग सहा वेळा अंदाजपत्रक सादर केले. त्यांच्या काळातच 2009 मध्ये 108 अब्ज रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले गेले होते. तर रेल्वे अंदाजपत्रक सादर करणाऱ्या (2000) पहिल्या महिला रेल्वेमंत्री ठरल्या त्या ममता बॅनर्जी (First Lady Rail Minister In India) . 2002 मध्ये दोन वेगवेगळ्या आघाड्यांच्या वतीने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीए आणि संयुक्त पुरोगामी आघाडी-यूपीए) अंदाजपत्रक सादर करणाऱ्याही त्या पहिल्या महिला रेल्वेअर्थमंत्री ठरल्या होत्या.

Why Railway Budget merged?
Union Budget: राजीव गांधींनी मांडला होता किमान कॉर्पोरेट टॅक्सचा प्रस्ताव

गौडा यांनी केली बुलेट ट्रेनची घोषणा

रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा (D V Sadanand Gouda) यांनी पहिल्यांदा 2014 च्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनची (Bullet Train) घोषणा केली, तसेच नऊ हायस्पीड रेल्वेही (High Speed Railway) सुरू केल्या होत्या. रेल्वे अंदाजपत्रकाचे पहिले दूरचित्रवाणी प्रक्षेपण 24 मार्च 1994 रोजी केले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()