नाशिक / पिंपळगाव बसवंत : ओझरच्या एचएएलमधील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पुरविण्याचा दीपक शिरसाठचा उद्योग एचएएल सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे आव्हान आहे. संशयित शिरसाठ याचा प्रशासनाशी अनेकदा वाद झाला असून, अकरा महिन्यांपासून त्याचे वेतन बंद होते. प्रतिबंधित क्षेत्रात कर्मचारी मोबाईलचा वापर करतातच कसा, असा भला मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दीपक शिरसाठच्या उद्योगाने एचएएलच्या सुरक्षेला आव्हान
‘एचएएल’मध्ये सामान्य नागरिकांसाठी प्रवेश नाही. कर्मचाऱ्यांनाही कठोर नियमावली आहे. कामकाजाच्या ठिकाणी मोबाईल वापराला प्रतिबंध आहे. पण हे सगळे दुर्लक्षित राहिल्याने दीपक शिरसाठचे फावले. त्याने कोणती माहिती पुरविली, किती दिवसांपासून खबरीलाल माहिती देत होते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. संशयित दीपक शिरसाठ मूळचा सिन्नर तालुक्यातील असून, २००७ पासून एचएएलमध्ये कार्यरत आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची ठराविक वर्षांनंतर बदली करण्याचा ‘एचएएल’चा नियम आहे. त्यानुसार शिरसाठची बदली वर्कशॉप ००६ विभागात वर्षभरापूर्वी करण्यात आली. त्या बदलीवरून शिरसाठने व्यवस्थापनाशी वाद घालत थयथयाट केला.
दीपकने वर्षभरपूर्वी आंदोलनही छेडले होते.
शिरसाठने बदली नाकारण्याचे कारणही नाजूक असल्याचे समजते. १४ महिन्यांपासून शिरसाठचा संघर्ष सुरू होता. बदली झालेल्या विभागात हजेरी नोंदवून शिरसाठ दिवसभर संवेदनशील ००६ वर्कशॉप विभागात वावरायचा, अशी चर्चा आहे. १४ महिन्यांपासून कर्तव्य बजावत नसल्याने व्यवस्थापनाने शिरसाठचा पगार बंद केला आहे. दिल्लीच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा वाद गेल्याचे बोलले जाते. बदली व पगार रोखल्याच्या कारणावरून शिरसाठ एचएएलविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारी होता. शिवाय वर्षभरपूर्वी आंदोलनही छेडले होते. दहा वर्षांपूर्वी कामगार संघटनेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या शिरसाठवर पाकिस्तानचा खबरी बनण्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.