संजीवनीदायक मालेगावच्या काढ्यामुळे 'अवघड जागेचं दुखणं' वाढतंय? वाचा डॉक्टरांचे मत

malegaon kadha.jpg
malegaon kadha.jpg
Updated on

नाशिक : कोरोनावर कुठलेही औषध नसल्याचे बोलले जात असले तरी मालेगाव काढा कुठेतरी त्यावर उपाय ठरत असल्याचा समज सर्वत्र आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगावमध्ये अचानक रुग्ण संख्या घटण्यामागे काढा असल्याचे म्हटले जात होते. पण..

संजीवनी ठरणाऱ्या मालेगावचा काढा आता झालयं दुखणं?

संपूर्ण राज्यात मालेगावचा काढा प्रसिद्ध झाला होता. गुजरातसह अन्य राज्यातील नागरीक काढा घेण्यासाठी मालेगाव येथे गर्दी करत होते. शहरातील हॉटस्पॉट ठरलेले जुने नाशिक आणि वडाळागावातही काडा गुणकारी ठरल्याने येथील रुग्ण संख्याही झपाट्याने घटली. कोरोना रुग्णासाठी संजीवणी ठरणाऱ्या मालेगावच्या काड्यासह घरा-घरात घरगुती स्थरावरील काडे बनविले जात आहे. परंतु या काड्यामधील उष्णतेच्या गुणधर्मामुळे काही नागरीकांमध्ये मूळव्यादच्या तक्रारीत वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरीकांमध्ये कोरोनाची भिती कायम असल्याने काढ्याचे सेवन सातत्याने सुरु आहे. मूळव्याद संबंधी काही त्रास जाणवत असल्यास तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. 

मूळव्याध ग्रस्तानसाठी डोकेदुखी

असा हा प्रसिद्ध मालेगावचा काढा मूळव्याध ग्रस्तानसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे बोलेले जात आहे. असे जरी असले तरी नागरीकांकडून तयार केले जाणारे घरगुती काढे ही त्यात भर पाडत आहेत. काढा घेतल्यानंतर अनेकाना मूळव्यादचा अधिकच त्रास जाणवू लागला आहे. उपचारासाठी रुग्णालयांमध्ये गर्दी होवू लागली आहे. अशा प्रकारे त्रस्त असलेले दैनदिन अनेक रुग्ण समोर येत आहे. आयुर्वेदिक काढा असताना त्याचा विपरीत परिणाम होणे याचे सर्वाना आश्‍चर्याचे वाटत आहे.

शरीरातील उष्णता वाढते

मूळव्याद रोग तज्ञ डॉक्टरानीही रुग्णानामध्ये वाढ झाल्याचे मान्य केले आहे. घरगुती काढ्यामध्ये गरम मसाला तयार कऱण्यासाठी वापरात असलेले लवंग, दालचिनी अशा विविध प्रकारच्या गरम पदार्थांचा वापर केला जात आहे. त्याचेही अतिसेवन होत असल्याने शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होत आहे. त्यातून मूळव्याधाचा अधि्क त्रास जाणवत आहे. त्यामुळे केवळ मालेगावचा काढा नव्हे तर घरगुती काड्याचे सेवन करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. डॉक्टरांचा सल्ला त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कुठेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले तर ते गुणकारीच ठरत असल्याचे डॉक्टरानी सांगीतले, त्यासाठी काढ्याचे अतिसेवन टाळावे, ठरवून दिलेल्या प्रमाणातच सेवन करावे. तसेच डॉक्टरांचा घेण्याचे आवाहन डॉक्टरानी केले. 
 
सोशल मिडीयावरील सल्ले टाळावे 

सोशल मिडीयावर काडा कोरोनावर गुणकारी ठरत आहे. अशा प्रकारे काडा तयार करावा. अशा विविध प्रकारचे सल्ले प्रसारीत करण्यात आले. कोरोनाच्या भितीपोटी नागरीकानी कुटलाही विचार न करता मालेगाव काडा आणि घरगुती काडा घेण्यास सुरुवात केली. बहुदा दोन्ही काडे एकत्र सेवन करण्याचेही प्रकार घडले. त्यामुळे शरीरात उष्णता वाढून अनेकाना मूळव्यादचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे सोशल मिडीयासह न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 

 
काडा घेतला आणि मूळव्याद झाला असे नाही. दोघांचा तसा सरळ संबंध नाही. चार टप्यात मूळव्याद होत असतो. एकाद व्यक्ती शेवटच्या टप्यात असेल आणि त्याने काडा सेवन केला असेल तर त्यास त्रास जाणवतो. कारण काड्यामध्ये उष्णतेचे प्रमाण अदीक आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी काडा घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होत नाही.  - डॉ. अजित खालकर (मूळव्याद आणि पोटविकार तज्ञ)  

संपादन- ज्योती देवरे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.