निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...

sunita mpsc.jpg
sunita mpsc.jpg
Updated on

नाशिक / उमराळे : विमल व पोपट गायकवाड हे दाम्पत्य कोरडवाहू शेती करतात. दोघेही निरक्षर असून अक्षराची ओळख नसतांनाही आपल्या मुलांनी खुप शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं. कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी ही जन्मतःच अपंग असल्यामुळे या कुटूंबाला तिची खुप काळजी होती. मात्र त्याच लेकीने असे काही करून दाखविले ज्याने त्या आई-वडिलांचे आनंदाश्रू थांबता थांबेना...

सुनिताचे कौतुकास्पद यश

दिंडोरी तालुक्यातील कोचरगांव येथे राहणार विमल व पोपट गायकवाड हे दाम्पत्य कोरडवाहू शेती करते. दोघेही निरक्षर असून अक्षराची ओळख नसतांनाही आपल्या मुलांनी खुप शिक्षण घ्यावं असं त्यांना वाटत होतं. या दाम्पत्यास चार मुले व दोन मुली असून एक मुलगा वस्तीशाळा शिक्षक झाल्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी ही जन्मतःच अपंग असल्यामुळे या कुटूंबाला तिची खुप काळजी होती. मात्र सुनिता लहानपणापासूनच जिद्दी व हुशार असल्यामुळे शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची. तिने प्राथमिक शिक्षण कोचरगाव जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा तिल्होळी येथे होती. बारावीत विदयालयात दुसरी आल्यामूळे डिएड करण्याचा विचार करून दिंडोरी येथे दोन वर्ष अभ्यासक्रम पुर्ण केला. महाविद्यालयीन शिक्षण समाजकल्याण वसतीगृहात राहून पुर्ण केले. डि एड् करून टीईटीच्या दोन्ही परिक्षा उत्तीर्ण असतांनाही शिक्षक भरती नसल्यामुळे सुनिताने (एम पी एस सी) व्दारे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत नपुणे (रांजणगाव) येथे स्पर्धा परिक्षांसाठी प्रवेश घेतला व दुसऱ्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. या तिच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक विवंचनेमुळे सुनिता गायकवाड हिलाही शेतमजुरीही करावी लागली. मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने परिस्थितीवर मात केली.

दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी

अपंगत्वावर मात करत डीएड् करुन शिक्षक बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सुनिता गायकवाड यांनी शिक्षक भरती होत नसल्याने निराश न होता एम पी एसी परिक्षेची तयारी करत ऑक्टोबर २०१९मध्ये झालेल्या परिक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

समाजसेवेचे काम करायचे आहे
१)अपंग असल्यामुळे  भविष्याची चिंता वाटायची पण जिद्द सोडली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानुन यशस्वी व्हायचचं ही खुणगाठ मनाशी बांधल्याने यश मिळवतां आले. अजुनही राज्य सेवेच्या माध्यमातून पुढील परिक्षा देऊन समाजसेवेचे काम करायचे आहे.-सुनिता गायकवाड

२)  मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिची नेहमी काळजी वाटायची.आम्ही आडाणी असतांनाही तिने मिळवलेल्या यशाने डोळ्यांतून नकळत आनंदाश्रु वाहू लागले. मुलीने नाव कमावले.- पोपट गायकवाड (वडील)

(संपादन - ज्योती देवरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()